Friday, 10 July 2020

नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले.


भारताचे नितीन मेनन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरील (आयसीसी) मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवले आहे.

मेनन हे ‘एलिट’ पंचांमध्ये स्थान मिळवणारे सर्वात तरुण पंच ठरले आहेत. आगामी 2020-21 हंगामासाठी इंग्लंडच्या नायजेल लाँग यांच्या जागी मेनन यांची निवड झाली आहे.

36 वर्षीय मेनन यांनी तीन कसोटी, 24 एकदिवसीय आणि 16 ट्वेन्टी-20 लढतींमध्ये पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

‘आयसीसी’च्या मुख्य पंचांमध्ये स्थान मिळवणारे मेनन हे श्रीनिवास वेंकटराघवन आणि सुंदराम रवी यांच्यानंतर भारताचे तिसरे पंच आहेत.

‘आयसीसीच्या जगातील मुख्य पंच आणि सामनाधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळवावे, हे सुरुवातीपासून स्वप्न होते. अजूनही विश्वास बसत नाही,’’ असे मेनन यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...