कालखंड :- इ.स. 1776 ते 1800
नेतृत्व :- मजनुन शहा, चिराग अली.
मुख्य ठिकाण :- उत्तर बंगाल, नेपाळमधील तराईचा प्रदेश
🖍 बंगालमधील मजनुन शहा नावाच्या फकीराने बंगालमधील फकीरांना एकत्रित करुन इंग्रजांच्या गोदामावर तसेच पोलिस ठाण्यांवर छापे मारण्यास सुरूवात केली व आपले केंद्र नेपाळच्या तराई भागात ठेवले.
🖍 मजनुन शहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा चिराग अलीने उत्तर बंगालमध्येब्रिटिशांविरुध्द लढा सुरूच ठेवला.
🖍 इंग्रजांनी शेतकऱ्यांना जादा सारा लावून त्यांची पिळवणूक केल्यामुळे महसूल अधिकारी, पोलीस यांच्याशी त्यांच्या नेहमी चकमकी चालत असे.
🖍 या इंग्रजांविरोधी लढ्यात राजपूत देखील सामील असे व भवानी पाठक, देवी चौधुराणी हे त्यांचे सहकारी होत.
No comments:
Post a Comment