Thursday, 6 January 2022

अवमूल्यनाचे प्रयोग.


🅾स्वातंत्र्यप्राप्तिनंतर रुपयाचे तीन वेळा अवमूल्यन घडवून आणण्यात आले होते.

🧩पहिले अवमूल्यन, 1949 –

🅾26 सप्टेंबर 1949 या दिवशी रुपयाचे अमेरिकन डॉलरच्या संदर्भात 30.5 टक्क्यांनी अवमूल्यन घडवून आणण्यात आले. पाउंड स्टर्लिंगच्या संदर्भात हे अवमूल्यन घडवून आणण्यात आले नाही.

🅾अवमूल्यनामुळे एका रुपयाची डॉलरमधील किंमत 30.2 सेंटस वरुन 21 सेंटस पर्यंत कमी झाली. तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0268601 ग्रॅम्स वरून 0.186621 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

🅾अवमूल्यनामुळे भारताची व्यापार तुट कमी झाली. 1948-49 मध्ये 185.1 कोटी रुपये असलेली व्यापार तूट 1949-50 मध्ये 141.9 कोटी तर 1950-51 मध्ये 49.6 कोटी रुपये एवढी कमी झाली. मात्र हा अनुकूल परिणाम फार काळ टिकला नाही. 1951-52 मध्ये तूट वाढून 237.1 कोटी रुपये झाली.

🅾तत्कालीन अर्थमंत्री – जॉन मथाई

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠दुसरे अवमूल्यन, 1966.💠💠

🅾6 जून 1966 रोजी रुपयाचे अवमूल्यन अमेरिकन डॉलर व इतर हार्ड यूरोपियन चलनांच्या संदर्भात 36.5 टक्क्यांनी घडवून आणण्यात आले.

🅾या अवमूल्यनामुळे रुपयाचा विनिमय दर 4.76 रुपये प्रती डॉलर वरून 7.50 रुपये प्रती डॉलर असा कमी झाला.

🅾तसेच एका रुपयाची सोन्यातील किंमत 0.186621 ग्रॅम्स वरून 0.118489 ग्रॅम्स पर्यंत कमी झाली.

🧩या अवमूल्यनाची उद्दिष्टे –

1) भारताची हार्ड चलन देशांकडून होणारी आयात कमी करणे.

2) भारताची निर्यात वाढविणे.

3) भारताचा व्यापारतोल कमी करणे.

🅾अवमूल्यनामुळे भारताची निर्यात वाढली मात्र दुष्काळी वर्षामुळे अन्नधान्याची आयात करावी लागल्याने व्यापार तूट अपेक्षेप्रमाणे कमी झाली नाही.

तत्कालीन अर्थमंत्री – सचिव चौधरी

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠तिसरे अवमूल्यन, 1991.💠💠

🅾जुलै 1991 मध्ये रुपयाचे अवमूल्यन तीन टप्प्यांमध्ये जगातील महत्वाच्या चलनांच्या संदर्भात (डॉलर, पाउंड, मार्क, येन, फ्रँक इ.) घडवून आणण्यात आले.

i) 1 जुलैला 9.5 टक्क्यांनी.

ii) 3 जुलैला 10 ते 10.78 टक्क्यांनी.

iii) 15 जुलैला 2 टक्क्यांनी. तिन्ही टप्पे मिळून रुपयाचे अवमूल्यन सुमारे 20 टक्क्यांनी झाले.

🅾तत्कालीन वित्तमंत्री – डॉ. मनमोहनसिंग.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠अवमूल्यनाचे परिणाम.💠💠

1) आयतीवरील परिणाम :

अवमूल्यनामुळे भारत आयात करीत असलेल्या वस्तूंची किंमत भारतात वाढते. आयात महाग झाल्याने आयातदरांची आयातीची प्रवृत्ती कमी होऊन आयातीचे आकारमान कमी होण्याची परिस्थिती निर्माण होते.

2) निर्यातीवरील परिणाम :

अवमूल्यनामुळे भारत निर्यात करीत असलेल्या वस्तूंची किंमत परदेशात कमी होते. भारतीय वस्तु परदेशात स्वस्त वाटायला लागल्याने परकीय आयातदार भारतीय वस्तूंची अधिक मागणी करायला लागतात. त्यामुळे भारताची निर्यात वाढण्याची परिस्थिती निर्माण होते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...