Sunday, 5 July 2020

महान महिला वैज्ञानिक-मेरी क्युरी

    जन्म-7 नोव्हेंबर 1867 (पोलंड)

🔸मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या....
🔸१८९५ साली त्यांचा विवाह पिएरे क्युरी यांच्याशी झाला.तेही संशोधक-शास्त्रज्ञ होते...
🔸मेरी आणि पिएरे क्युरी या दाम्पत्याने पिचब्लेंडसारखी खनिजं युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात किरणोत्सारी असतात,हे दाखवून दिलं.
🔸मेरी यांनी पिचब्लेंडमधून मोठय़ा प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ वेगळा करून एक नवं मूलद्रव्य तयार केलं...
🔸या नव्या मूलद्रव्यास मेरी यांनी आपल्या पोलंड या जन्मदेशावरून ‘पोलोनियम’ असं नाव दिलं...
🔸पुढे मेरी आणि पिएरे क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी असं ‘रेडियम’ नावाचं मूलद्रव्य सापडलं. १९०३ साली मेरी आणि त्यांचे पती पिएर क्युरी तसेच हेन्री बेक्वेरेल यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून दिलं गेलं...
🔸रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या...
🔸नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत, 2 वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला आहेत...
🔸त्यांचे सर्वात मोठे शोध म्हणजे रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीचा शोध,रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्याला वेगळे करणे आणि पोलोनियम व रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध...
🔸रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल मेरी ला १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक...
🔸यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथम शरीरावरच्या सुजेवर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्यांचा वापर करून उपचार...
🔸मेरी यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्ध जखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली,क्ष-किरण यंञे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं.
🔸यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या प्रीत्यर्थ मागचे 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून साजरे...
🔸मेरी क्युरी यांना रेडीयेशनचे दुष्परिणाम स्वतःला टाळता न आल्याने ४ जुलै १९३४ या दिवशी ल्युकेमियाने झाला...
🔸पुढे क्युरी दांम्पत्याची मुलगी इरीन ज्युलीयट-क्युरी व जावई फ्रेडरिक ज्युलीयट या दांपत्यास रसायनशास्त्राचा नोबेल 1935 मध्ये मिळाला(for their discovery of artificial radioactivity)...
   

No comments:

Post a Comment