🔰ऑनलाइन वर्गात शिकणाऱ्या अमेरिकी विद्यापीठातील परदेशी विद्यार्थ्यांच्या मायदेशी पाठवण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने रद्द केला आहे.
🔰हार्वर्ड, एमआयटी यासह अनेक विद्यापीठांनी या निर्णयाविरोधात स्थलांतर व अंतर्गत सुरक्षा विभागाविरोधात न्यायालयात दावे दाखल केले होते. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता. उन्हाळी शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गासाठी हजेरी लावणार असतील त्यांना देशातून परत पाठवण्याचा निर्णय अमेरिकेच्या स्थलांतर विभागाने ६ जुलै रोजी घेतला होता.
🔰सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यानच्या शैक्षणिक सत्रात करोना संसर्गाच्या भीतीने अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले असताना ट्रम्प प्रशासनाने जे परदेशी विद्यार्थी ऑनलाइन वर्गास हजेरी लावणार असतील त्यांना मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दोन आठवडय़ांनी या निर्णयावर मंगळवारी माघार घेण्यात आली असून एमआयटी, हार्वर्ड विद्यापीठ यांच्यासह एकूण दोनशे शिक्षण संस्थांनी याविरोधात न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली होती. या निर्णयाला विरोध करण्यात १७ राज्ये, गुगल, मायक्रोसॉप्ट, फेसबुक यासारख्या कंपन्याही सहभागी होत्या.
No comments:
Post a Comment