Saturday, 18 June 2022

मानवी चेतासंस्था

- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत.
- मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते.

● मानवी मेंदू
- चेतासंस्थेचे नियंत्रण करणारा प्रमुख भाग
- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते
- 100 अब्ज चेतापेशींपासून मेंदूची निर्मिती
- मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये: संभाषण, लिखाण, तर्कसंगत व विश्लेषणात्मक विचार, भाषा, शास्त्र व गणित
- मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये: सर्वांगीण व प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत
- डावी आणि उजवी बाजू एकमेकास नियंत्रीत करतात
- प्रमस्तिष्क: मोठा मेंदू
- अनुमस्तिष्क: छोटा मेंदू
- मस्तिष्कपुच्छ: सर्वात शेवटचा भाग

● मेरूरज्जू
- त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे
- मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे
- प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.

No comments:

Post a Comment