Saturday 25 July 2020

75 वर्षांत प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) भरणार

🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच आभासी पद्धतिने संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) आयोजित केली जाणार आहे.

🔰सत्रासाठी सदस्य राष्ट्रांचे प्रमुख त्यांचे पूर्व-रेकॉर्ड केलेले भाषण संघटनेकडे पाठवतील, जे सभेदरम्यान चालवले जाणार आहेत. सभेला 21 सप्टेंबर 2020 पासून सुरुवात होणार आहे.

🔴संयुक्त राष्ट्रसंघ (UN)  विषयी...

🔰आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.

🔰1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.

🔰संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.

🔰UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.

🔰संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारीपद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

No comments:

Post a Comment