Tuesday, 21 July 2020

भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक- विवो स्मार्टफोन निर्माता कंपनी.



स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोनं भारतातच मोबाईल फोन विकसित करण्यासाठी इंडस्ट्रियल डिझाईन सेंटरची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसंच कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या वाढवून 50 हजार करण्यात येणार आहे. “कंपनीनं भारतात 7 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

याद्वारे कंपनीची मोबाईल उत्पादन क्षमता सध्याच्या 3.3 कोटी युनिट्सवरून 12 कोटी युनिट्सपर्यंत  वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती विवो इंडियाचे संचालक (ब्रँड स्ट्रॅटेजी) निपुण मारया यांनी दिली.

भारतातच डिझाईन केलेला आणि भारतातच निर्मिती केलेला विवोचा पहिला फोन 2020-21 च्या दरम्यानच लाँच होणार आहे.

कंपनीनं आपल्या ग्रेटर नॉयडा येथील प्रकल्पाच्या विस्तारासाठी 7 हजार 500 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचीही घोषणा केली. भारतीय बाजारपेठेत विवोचा हिस्सा तब्बल 21 टक्के आहे आणि ती दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनीही ठरली आहे.

No comments:

Post a Comment