Wednesday 22 July 2020

पेपर खरच होतील का राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा 2020(सप्टेंबर/ऑक्टोबर) ?

टीप: हे माझे मत आहे आयोगाचे नाही.

आयोगाने काही महिन्यांपूर्वी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेचे वेळापत्रक दिले परंतु ते देताना मुख्य परिक्षेबद्दल सांगितले नाही आणि सेंटर बदलुन देण्याबाबत ही काही सांगितले नाही.आयोगाने मुख्य परिक्षेच्या तारखा न देन हे समाजण्यासारखा नाही कारण पूर्व चे वेळापत्रक आयोग देत असेल तर त्यामागे असा विचार असेल की तोपर्यंत करोना थोडा आटोक्यात येईल मग जर सप्टेंबर ऑक्टोम्बर पर्यंत करोना आटोक्यात येणार असेल तर मग पुन्हा वाढण्याचे काही चान्सेस नाहीत मग मुख्य परीक्षेच timetable देण्यात काहीच अडचण नव्हती.म्हणजेच आयोगाच्या मनात ही खात्री दिसत नाहीये की नक्की आपण सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये परीक्षा घेऊ की नाही त्यामुळे कदाचित मुख्य परीक्षेच्या तारखा न बाबत आयोगाने विचार केला नसावा.
दुसरी गोस्ट अशी की जर आयोगाला पेपर घ्यायचेच असतील तर आयोगाला परीक्षा केंद्र पुन्हा निवडण्याची संधी मुलांना द्यावीच लागेल.कारण पुण्याचा विचार केला तर पुण्यात परीक्षा केंद टाकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40,000 असते यातील 5 ते 7 हजार मुले मूळ पुण्यातील पकडली तरी राहणारी जवळपास 33 ते 35 हजार मुले बाहेरील जिल्ह्यातून पुण्यात येणारी असतील आणि सध्याची परिस्थिती पाहता ही रिस्क घेणे आयोगाला आणि शासनाला परवडेल असा वाटत नाही तसेच 4 महिने घराबाहेर न पडुदेणारे आणि कडक lockdown पाळणारे पालक यासाठी मुलांना पुण्या मुंबई ला जाऊ देतील का ? पेपर ची वेळ ही सकाळी 11 ला असल्याने लांबून येणाऱ्या बहुदा सर्वच मुलांना आदल्याच दिवशी पुण्यात यावे लागेल आणि बऱ्यापैकी मुलांनी आधीच रूम सोडून सर्व सामान घरी नेल्याने पेपर च्या आदल्या दिवशी नातेवाईकां कडे राहावे लागेल व जिथे राहतील त्यातील बरेच ठिकाने ही आधीची कंटेन्मेंट झोन होऊन गेली असतील तर तिथे राहण्याची मुले आणि त्यांचे पालक रिस्क घेतील का असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाही अशीच असतील.आशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा रोष पत्करून पेपर घेणे आयोगाला परवडेल का ? आणि जर चुकून (असे काही होऊ नये ही देवा कडे प्रार्थना) पेपर झाले आणि 4 लाख मुलांपैकी एकाचे काही बरे वाईट झाले तर आयोग आणि शासन सर्व बाजूनी होणारी टीका सहन करण्यास तयार आहे का ?
दुसरा मुद्दा असा की जर आयोगाने परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली आणि आपल्या आपल्या जिल्हयात पेपर घेतन्याचे ठरविले तर गडचिरोली चंद्रपूर सारख्या भागात नेहमी असणारी दोन हजार विद्यार्थी क्षमता जर 5 हजार किंवा जास्त होणार असेल तर अशा भागत एवढ्या सुविधा आशा काळात कुठून उभ्या करणार,आशा दुर्गम भागात प्रत्येक केंद्रावर cctv असेल अथवा इतर सुविधा कशा उपलब्ध करून देणार....?

मग नक्की पेपर होतील की नाही ?
माझ्या मते जेंव्हा आयोग परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देणारी सूचना  काढेल तेंव्हा परीक्षा घेण्याच्या दृष्टीने आयोग positive विचार करत आहे असा समजाव...परीक्षा केंद्र आहेतेच ठेऊन परीक्षा होतील असा मलातरी अजिबात वाटत नाही....एव्हड लिहिण्याचा कारण हेच की फोकस हा अभ्यासावर राहुद्यात पेपर याच तारखेला होतील यावर नको...धन्यवाद🙏

No comments:

Post a Comment