- प्रख्यात मल्याळी कवी अक्क्रीथम यांना 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- निवड समितीचे अध्यक्ष ज्ञानपीठ विजेत्या कादंबरीकार प्रतिभा रे होत्या.
● अक्क्रीथम (अक्क्रिथम अच्युतन नंबुदी)
- जन्म: 18 मार्च 1926
- केरळमधील पालक्कड जिल्ह्याचे रहिवासी
- मल्याळी साहित्यातील भीष्माचार्य अशी ओळख.
- त्याच्या नावावर 55 पुस्तके, 45 कवितासंग्रह आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- उन्नी नंब्रुदी' या मासिकाचे ते संस्थापक आहेत.
- अस्पृश्यतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या पहिल्या मल्याळी साहित्यिकांपैकी अक्क्रिथम हे एक.
- योगक्षेम सभा' आणि 'पलियम सत्याग्रह' या दोन संस्थामार्फत त्यांनी अनेक दशके हिरारीने सामाजिक काम केले.
- वीरवदम', 'निमिष क्षेत्रम', 'अमृत कतिका', 'अक्कीथम कवितका', '21 व्या शतकातील महाकाव्य', आणि 'अंतिमहाकालम' ही साहित्ये त्याची प्रसिद्ध आहेत.
- त्याना 1973 ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर 1972 आणि 1988 ला केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
- मातृभूमी सन्मान, वायलर सन्मान आणि कबीर सन्मान आदींनी त्यांना गौरविले आहे.
● ज्ञानपीठ पुरस्कार
- सुरुवात: 1965
- शांतीप्रसाद जैन: संस्थापक
- साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
- स्वरुप - 11 लाख आहे.
- आतापर्यंत 22 भाषेपैकी सिंधी भाषेला एखाद्याही ज्ञानपीठ मिळाला नाही.
- हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही.
- सर्वाधिक अकरा वेळा हिंदी भाषेला हा पुरस्कार मिळाला.
● मराठी भाषेला चार वेळा ज्ञानपीठ मिळाला.
- वि. स. खांडेकर - 1974
- वि. वा. शिरवाडकर - 1987
- विंदा करंदीकर - 2003
- भालचंद्र नेमाडे - 2014
● पुरस्काराचे नाविन्य
- आतापर्यंत सात महिलांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
- अक्क्रिथम ज्ञानपीठ मिळणारे सहावे मल्याळी लेखक ठरले.
- पहिला ज्ञानपीठ : गोविंद शंकर कुरूप (मल्याळम) 'ओडोक्नुफल' महाकाव्याबद्दल
- आतापर्यंत 59 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला.
- पुरस्कार प्राप्त पहिली महिला - आशापूर्णा देवी
No comments:
Post a Comment