०७ जुलै २०२०

15 ऑगस्ट पर्येंत करोना वर लस सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.

🔰करोना लसीवरील संशोधन लवकरात लवकर संपवून स्वातंत्र्य दिनापर्यंत (15 ऑगस्ट) लस सर्वत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (आयसीएमआर) करत असल्याचे उघड झाले आहे.

🔰आयसीएमआर’ने लसीची मानवी चाचणी करणाऱ्या रुग्णालयांना पाठवलेल्या पत्रात लस उपलब्ध करण्याची ‘अंतिम तारीख’ नमूद केली  आहे.

🔰आयसीएमआर’ने भारत बायोटेक कंपनीच्या ‘कोव्हॅक्स’ या लसीच्या मानवी चाचणीला गेल्या आठवडय़ात परवानगी दिली होती.

🔰केवळ दीड महिन्यांतील चाचण्यांनंतर ही लस लोकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. मानवी चाचणी घेतल्यानंतर 15 ऑगस्टला ही लस सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...