Sunday, 21 June 2020

UNSC आठव्यांदा भारताची तात्पुरत्या सदस्यपदी निवड


◾️ भारताची आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या (UNSC) च्या तात्पुरत्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

◾️ दरम्यान, या विजयानंतर भारत २०२१-२२ या वर्षासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा तात्पुरता सदस्य बनला आहे.

◾️ १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्र महासभेनं आपल्या ७५ व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य आणि आर्थिक तसंच सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली होती.

🔰भारतासोबतच
📌 आयर्लंड,
📌 मॅक्सिको आणि
📌 नॉर्वे या देशांनाही सुरक्षा परिषदेत स्थान मिळालं आहे.

◾️ विजयानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी प्रतिक्रिया दिली. भारत नेतृत्व कायम ठेवणार असून उत्तम बहुपक्षीय प्रणालीला नवीन दिशा देणार असल्याचं ते म्हणाले.

◾️भारताला १९२ पैकी १८४ मतं मिळाली. “
_______________________________________

No comments:

Post a Comment