Tuesday 23 June 2020

MPSC पूर्व परीक्षांबाबत थोडक्यात मार्गदर्शन

✅ विद्यार्थी मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व यांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केले आहे.【राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर तर ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त पूर्व गट - ब परीक्षा】..

✅ तर आपण उर्वरित दिवसांचे कसे नियोजन करावे याबद्दल तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे.

✅ आपण सध्या बरेच जण घरी अभ्यास करत आहात तर आपण जवळच्या शाळेत जाऊन अभ्यास करणाऱ्या मित्रांनी एकत्र येऊन तिथे अभ्यास करू शकता.. किंवा गावातच एखादी रिकामी खोली मध्ये अभ्यास करू शकता.

✅ सध्या वेळापत्रक आल्यामुळे किमान रोज १० तास अभ्यास झाला पाहिजे. तर आपण दर ५० मिनिटं अभ्यास १० मिन ब्रेक असे गट पाडूयात. पण या १० मिन मध्ये दुसरा कोणताही घ्यायचा नाही. फ्रेश होऊन बसण्यासाठी तसेच थोडा शांत बसून ध्यान करून ५० मिनिटं आपण काय वाचले यासाठी हा १० मिन चा ब्रेक आहे. मग परत ५० मिन अभ्यास १० मिन ध्यान करून वाचलेलं आठवणे असे करून अभ्यास करू शकता.. ही खूपच उपयुक्त पद्धती आहे.

✅ तर सर्वांनी शक्य होईल तेव्हढे लवकर सकाळी अभ्यासाला बसावे.

🏆 सध्या राज्यसेवा पूर्व २०२० चे कसे असावे अभ्यासाचे नियोजन या बद्दल सांगतो. नंतर 🏆संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब - २०२० बद्दल सांगेल...

◾️ 8 ते 8:50     = 50 मिन
◾️ 9 ते 9:50     = 50 मिन
◾️ 10 ते 10:50 = 50 मिन
◾️ 11 ते 11:50 = 50 मिन

☑️ या 200 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता. यानंतर 40 मिन मध्ये जेवण तसेच इतर सर्वकाही करून लगेच 1 ला बसावे अभ्यासाला.

◾️ 1 ते 1:50 = 50 मिन
या 50 मिन मध्ये रोज चालू घडामोडी विषय वाचवा.

◾️ 2 ते 2:50 = 50 मिन
◾️ 3 ते 3:25 = 25 मिन

☑️ या 75 मिन मध्ये रोज Comprehension म्हणजेच मराठी & इंग्रजी उतारे यांचा सराव करावा.

◾️ 3:30 ते 4:20 = 50 मिन
◾️ 4:30 ते 5:20 = 50 मिन
◾️ 5:25 ते 6:00 = 25 मिन

☑️ या 125 मिन मध्ये रोज गणित आणि बुद्धिमत्ता याचा सराव करावा.
✅ असे एकूण 200 मिन तरी C-SAT चा रोज स्टडी केला पाहिजे

◾️ 6:00 ते 6:30 = नाष्टा किंवा बाकी काम असेल काही तर करावे.

◾️ 6:30 ते 7:20 = 50 मिन
◾️ 7:30 ते 8:20 = 50 मिन
◾️ 8:30 ते 9:20 = 50 मिन

☑️ या 150 मिन मध्ये 1 मुख्य विषय वाचू शकता.

◾️ 9:20 ते 10 जेवण + इतर काम

◾️ 10 ते 10:50 = 50 मिन

☑️ या 50 मिन मध्ये 1 रोज एकच विषय या time ला वाचू शकता. Like इंडियन पोलिटी... कारण हा विषय पूर्व बरोबरच मुख्य ला देखील महत्त्वाचा Scoring विषय आहे.

✅✅ असे एकूण कमीतकमी 650 मिन स्टडी  【म्हणजेच जवळपास 11 तास】असे आपण【200 मिन. मुख्य विषय - १ + 50 मिन. चालू घडामोडी + 200 मिन. CSAT + 150 मिन. मुख्य विषय -२ + 50 मिन. रेग्युलर १ विषय.】करू शकता.  ते ही जास्त टेन्शन न घेता. ✅✅

1 comment:

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...