🅾इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.
🅾कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
🅾भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.
🧩इतर ठळक बाबी...
🅾या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.
🅾सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते.
🅾शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
🅾सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.
🅾मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.
🅾सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
No comments:
Post a Comment