Wednesday 3 June 2020

IASST संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी वनौषधीयुक्त ‘स्मार्ट बँडेज’ विकसित केले


केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या इन्स्टिटयूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IASST) या संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमांसाठी “pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बँडेज” विकसित केले आहे, जे जखमेसाठी उपयुक्त असून औषधाचा pH टिकुन राहतो.

कापूस आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ वस्तूंचा वापर करून अतिसूक्ष्म तंत्रज्ञानावर (nanotechnology) आधारित ‘कॉटन पॅच’ विकसित करण्यात आला आहे.

ठळक बाबी

🔸डॉ. देवाशिष चौधरी यांनी केलेल्या संशोधनात, ज्युट कार्बन डॉट्ससह नॅनो कॉम्पोजिट हायड्रोजेलयुक्त कॉम्पॅक्ट कॉटन पॅच तयार केले गेले. फ्लोरोसंट कार्बन डॉट्सचे सिंथेसाइझिंग करण्यासाठी ज्यूटचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला आहे आणि ते पसरले जावे यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. कडुलिंबाच्या पानांचा (आझादिराछताइंडिका) अर्क हे नमुना औषध अभ्यासात उदाहरण म्हणून घेतले गेले आहे.

🔸उत्तेजक-प्रतिसाद देणाऱ्या या नव्या औषध वितरण प्रणालीमध्ये, ज्युट कार्बन डॉट्स हायड्रोजेल मॅट्रिक्स-कॉटन पॅचमध्ये बंदिस्त केले असून दोन वेगळ्या pH पातळीवर प्रभावीपणे औषध पुरवठा करू शकतात.

🔸जखमेत जीवाणूचा संसर्ग वाढल्यास फॅब्रिकेटेड हायब्रिड कॉटन पॅचचा उत्तेजक-प्रतिसादात्मक गुणधर्म फायद्याचा ठरतो आणि यामुळे खालच्या pH कडे औषध जाते जे या परिस्थितीत अनुकूल असते. कॉटन पॅचचे हे pH-प्रतिसादात्मक वर्तन कार्बन डॉट तयार करताना वेगवेगळ्या मॉलेक्युलर संबंधांमुळे सिस्टममध्ये समाविष्ट केलेल्या जूट कार्बन डॉट्सच्या विशिष्ट वर्तनानुसार आहे.

🔸हायब्रीड कॉटन पॅचच्या अशा उत्तेजक-प्रतिसाद वर्तनाचा विकास जखमेसाठी ते स्मार्ट ड्रेसिंग किंवा मलमपट्टी म्हणून वापरण्याचा मार्ग सुकर झाला. पॅच तयार करण्यासाठी कॉटन आणि ज्यूट यासारख्या स्वस्त आणि टिकाऊ साहित्याचा वापर केल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया जैव-संगत, बिन विषारी, कमी खर्चाची आणि टिकाऊ झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...