Sunday, 24 October 2021

Forward Bloc : फॉर्वर्ड ब्लाॕक

सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की,

"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."

या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.

पक्षाचे उद्दीष्ट -

कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते.

अध्यक्ष -उपाध्यक्ष

बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.

जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला.

जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.

त्यात
अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,
उपाध्यक्ष- एस.एस. कविशर
सरचिटणीस- लाल शंकरलाल
सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .

आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना
मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते.

मुखपत्र-फार्वड ब्लॉक

"नागपुर-पहिली परिषद "

२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.
परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली.

ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...