■
१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
◆ अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
◆ विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
◆ फक्त पुरुषांनाच होतो.
========================
२) मोतीबिंदू (Cataract):
◆ डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
◆ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
========================
३) काचबिंदू (Glaucoma):
◆ हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
◆ काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
◆ डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
========================
४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
◆ व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
========================
५) डोळे येणे (Conjuctivitis):
◆ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.
========================
६) खुपरी (Trachoma):
◆ संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
◆ प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.
७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
◆ पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
◆ या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार.)
◆ प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
◆ दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
◆ कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
◆ त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
◆ जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट.
◆ तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
◆ जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
◆ मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
◆ मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
◆ मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
◆ पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
◆ ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.
▼
No comments:
Post a Comment