Monday, 31 January 2022

अंतःस्त्रावी संस्था (Endocrine System)

आपल्या शरीरात विविध ठिकाणी काही विशिष्ट अवयव रासायनिक पदार्थांची निर्मिती करतात. या रासायनिक पदार्थांनाच विकरे किंवा संप्रेरके असे म्हणतात. आपल्या शरीरात जी अवयव विकरे किंवा संप्रेरके स्रवतात त्यांना ग्रंथी असे म्हणतात. आणि अशा ग्रंथींच्या समुहापासून अंतःस्त्रावी संस्था तयार होते. अंतः स्त्रावी ग्रंथीतून स्त्रवणारे संप्रेरके सरळ रक्तात मिसळतात कारण त्यांच्या वहनासाठी माध्यम नसते. म्हणून त्यांना नलिका विरहित ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथीशिवाय आपल्या शरीरात काही विशिष्ट ठिकाणी बाह्यस्त्रावी ग्रंथी असतात. यातून स्रवणाऱ्या संप्रेरकांच्या वहनासाठी नलिका असते. म्हणून यांना नलिकायुक्त ग्रंथी असेही म्हणतात.

अंतःस्त्रावी ग्रंथी (Endocrine Glands):

1)  पियुषिका ग्रंथी (Pitutary Gland):

ही सर्वात लहान अंतःस्त्रावी ग्रंथी असून आपल्या शरीरात मेंदूमध्ये आढळते. या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. कारण, या ग्रंथीमुळे इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते.

या ग्रंथीतून सोमॅटोट्रॉपिन हे वृद्धी संप्रेरक स्त्रवत असते.
हे विकर जास्त प्रमाणात स्रवल्यास व्यक्ती जास्त उंच होतो, तर कमी प्रमाणात स्रवल्यास त्या व्यक्तींची उंची कमी राहते.
कार्य : आपल्या शरीरात वाढ, विकास, प्रजनन, इतर ग्रंथींचे कार्य नियंत्रण करते.

2) हायपोथॅलॅमस (Hypothalamus):

ही ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये पियुषिका ग्रंथीच्या बाजुला आढळते. यातून थायरोट्रोपीन (TRH), डोपॅमाईन, वृद्धीसंप्रेरक, सोमॅटोस्टॅटिन, गोनॅडोट्रोपिन, कॉर्टिकोट्रोपीन, ऑक्झिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन (ADH) ही संप्रेरके स्रवतात.

कार्य:

थायरोट्रोपिनमुळे पियुषिका ग्रंथीतून थायरॉईड उद्दीपन संप्रेरक स्रवण्यास मदत होते.

डोपॅमाईनमुळे मेंदूतील चेतापेशींचे कार्य नियंत्रित करण्यासाठी प्रोलॅक्टिन रसायन स्रवले जाते.
सोमॅटोस्टॅटिनमुळे वाढ आणि विकास नियंत्रित केली जाते.

व्हॅसोप्रेसिन संप्रेरकांमुळे वृक्क मालिकेतील पाण्याचे वहन नियंत्रित केले जाऊन रक्ताचे आकारमान नियंत्रित राहते.

3) पिनल ग्रंथी (Pineal Gland):

मेंदूच्या आतील भागात आढळते. यामधून मेलॅटॉनिन हे संप्रेरक स्त्रवते. हे संप्रेरक सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाल्यानंतर स्रवण्यास सुरुवात होते म्हणूनच आपल्याला झोप येते.

4) थायरॉईड ग्रंथी (Thyroid Gland):

ही ग्रंथी आपल्या शरीरात गळ्याच्या खालील भागात श्वसननलिकेच्या तोंडावर असते. या ग्रंथीमधून थायरॉक्झीन (Thyroxine) आणि ट्रायआयोडो थायरॉनॊईन (Tri-iodo-Thyronoine) नावाचे संप्रेरक स्त्रवत असते.

या संप्रेरकाच्या कमी स्रवण्यामुळे लहान मुलांना Cretinism नावाचा रोग होतो. म्हणजे त्यामध्ये मुलगा कमी खातो, जास्त झोपतो, जीभ लांब होते इत्यादी दोष दिसून येतात.

हे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये कमी झाल्यास Myxedemerma नावाचा रोग होतो. अशा व्यक्तीस थंडी सहन होत नाही आणि तो शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या दुर्बल बनतो.
कार्य:

तसेच मानसिक वाढ नियंत्रित करणे.
ऊर्जानिर्मिती तसेच रोगप्रतिकारक क्षमता नियंत्रित करणे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...