Monday, 27 December 2021

प्लावक बल (Buoyant Force)

◆ बोटांनी दाबून पाण्याच्या तळाशी नेलेला लाकडी ठोकळा बोट काढताच उसळी मारून पाण्याच्या पृष्ठभागाशी येतो.

◆ पाण्यात बुडलेला असल्याने ठोकळ्यावर कार्य करणारे पाण्याचे बल ठोकळ्याला वर ढकलते.

◆ द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल असे म्हणतात. प्लावी बलालाच प्लावक बल किंवा उत्प्रनोद असेही म्हणतात.

◆ प्लावक बल हे नेहमी वरच्या दिशेने लावलेले बल असते.

◆ द्रवात बूडालेल्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.

◆ द्र्वाची घनता जास्त असल्यास प्लावक बल अधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे प्लावाकबल ठरविते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु तरंगते. 

◆ प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असल्यास वस्तु बुडते.

◆ प्लावक बल वस्तूच्या वजना इतके असल्यास वस्तु द्रवाच्या आतमध्ये तरंगते.
यावर खालील प्रकारचा प्रश्न येवू शकतो.
===========================
प्र.1 खालील पैकी अयोग्य विधान/ने ओळखा.

अ. द्रवात बुडलेल्या वस्तूला वर ढकलणाऱ्या बलाला प्लावी बल असे म्हणतात.

ब. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असल्यास वस्तु बुडते. 

क. वस्तूच्या आकारमानाचा व प्लावक बलचा संबंध व्यस्त असतो.
पर्याय.
🛑A. विधान अ फक्त.
⚫️B. विधान अ व ब फक्त.
🔵C. विधान ब व क फक्त.
🔘D. फक्त विधान क.
---------------------------------------------------
प्र.2 खालील पैकी अचूक विधान/ने निवडा.

अ. प्लावक बल हे नेहमी खालच्या दिशेला लावले जाते.

ब. एखाद्या वस्तूवरील प्लावक बल जितके कमी तितके त्या वस्तूचे आकारमान कमी असते.

क. द्र्वामध्ये एखादा पदार्थ तरंगणार की बुडणार हे गुरुत्वबल ठरविते.
पर्याय.
🛑A. विधान अ चूक फक्त.
⚫️B. विधान अ व ब अचूक.
🔵C. विधान ब अचूक फक्त.
🔘D. वरील सर्व विधाने अचूक.
---------------------------------------------------
उत्तरं वरच्या Passage मध्ये शोधा, Confirm उत्तरं नाही समजली तर comments करा

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...