Saturday, 23 October 2021

महाराष्ट्रातील नद्या

◾️गोदावरी

गोदावरी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी ही महाराष्ट्रातील ०९ जिल्हयातुन वाहते. दख्खनच्या पठारावर सह्याद्री पर्वतापासुन पुर्व घाटापर्यंत ही नदी वाहते. गोदावरी नदीस “दक्षिण गंगा” किंवा “ब्रहद्ध गंगा” या नावानेही ओळखले जाते.गोदावरी नदीच्या खोऱ्यास “संतांची भुमी” असेही म्हटले जाते. रामायणामध्ये प्रभु रामचंद्रांनी गोदावरी नदीच्या तीरावरील पंचवटी या ठिकाणी वास्तव्य केल्याचे उल्लेख आहे. महर्षी वाल्मिकी यांना रामायण हे महाकाव्य लिहण्याची स्फुर्ती गोदावरी नदीच्या काठावरुनच मिळाली होती. महाभारतामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख “सप्त गोदावरी” असा केलेला आहे. हिंदु धर्माचा “सिंहस्थ कुंभ मेळा” गोदावरी च्या काठावर नाशिक मध्ये दर १२ वर्षांनी भरतो. या आधी २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक येथे भरला होता. 

गोदावरी नदीचा उगम :-

सह्याद्री पर्वतामध्ये नाशिक जिल्हयामध्ये ञ्यंबकेश्वर जवळील “ब्रम्हिारी” पर्वतामध्ये गोदावरी उगम पावते. ञ्यंबकेश्वर हे ठिकाण भारतातील १२ ज्योर्तीलिंगापैकी एक आहे. गोदावरी नदीचा उगम अरबी समुद्रापासुन ८० किमी अंतरावर होतो. या नदीच्या प्रवाहाची दिशा पश्चिमेकडून पुर्वेस व आग्नेय दिशेस आहे. गोदावरी नदी महाराष्ट्र व आंध्रप्रदेश या देानच राज्यांतुन वाहते. गोदावरी नदीची एकूण लांबी ***** किमी एवढी आहे.गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ६६८ किमी एवढी आहे. संपुर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेञ व्यापले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातील एकूण ०९ जिल्हयांतुन वाहते. १)नाशिक २)अहमदनगर ३)ओैरंगाबाद ४) बीड ५) जालना ६) हिंगोली ७)परभणी ८) नांदेड ९)गडचिरोली या जिल्ह्यांमधुन वाहते.

गोदावरीच्या उपनद्या

पुर्णा, काटेपुर्णा, मांजरा, पैनगंगा, वर्धा, इंद्रावती, दारणा, प्रवरा, सिंधफणा,कुंडलिका, बोरा इत्यादी.

गोदावरी नदीच्या काठावरील शहरे

नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षसभुवन.

गोदावरी नदीवरील धरणे

गोदावरी नदीवर भारतातील पहिले मातीचे धरण गंगापुर जि. नाशिक येथे बांधण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुद्देशिय “जायकवाडी प्रकल्प” हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्हयातील पैठण येथे आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास “नाथसाार” असे म्हणतात. जपान या देशाने या प्रकल्पासाठी १९७५ मध्ये आर्थिक मदत केली होती.


◾️भीमा नदी

भीमा नदीचा उमा भीमाशंकर, पुणे येथे होतो. देशातील १२ ज्योर्तीलिंगांपैकी भीमाशंकर हे एक ज्योर्तीलिंग आहे. भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी ४५१ किमी एवढी आहे. भीमा नदी कर्नाटक राज्यामध्ये रायचुर जवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, सोलापुर, सातारा, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद.

भीमा नदीच्या उपनद्या

भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरा, भोगावती, सीना, घोड, वेळ, माण इ.

भीमा नदीचा प्रवाह हा सुरुवातीस पुर्वेस व नंतर आग्नेयेस आहे. ही नदी पंढरपुर या तीर्थक्षेञामध्ये आल्यास चंद्रकोरीचा आकार घेते म्हणून तीला पंढरपुर येथे ” चंद्रभागा” या नावाने ओळखले जाते. भीमा नदीची उपनदी “इंद्रायणी” नदीच्या काठावर “देहु व आळंदी” ही तीर्थक्षेञे पुणे जिल्हयात आहेत. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये “उजणी धरण” बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयास “यशवंत सागर” या नावाने ओळखले जाते.

कृष्णा नदी

कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जि. सातारा येथे होतो. कृष्णा नदीच्या प्रवाहाची दिशा सुरुवातीलस पश्चिमेकडुन दक्षिणेस व नंतर पुर्वे व आग्नेय दिशेस आहे. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या ०३ राज्यातुन वाहते. कृष्णा नदीची एकूण लांबी १२८० किमी एवढी व महाराष्ट्रातील लांबी २८२ किमी एवढी आहे. कृष्णा नदी महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्हयांतुन वाहते.

कृष्णा नदीच्या उपनद्या

कोयना, वारणा, वेण्णा, येरळा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा, घटप्रभा व नंदला इ. कोयना नदीस “महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी” म्हणून ओळखले जाते. कोयना नदीवर “कोयना धरण” बांधण्यात आले आहे.

कृष्णा नदीच्या काठावरील शहरे

वाई, कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाची वाडी, मिरज इ.

तापी नदी

तापी नदी ही पश्चिम वाहीनी नदी आहे. उत्तरेस सातपुडा पर्वत रांगा व दक्षिणेस सातमाळा डोंगर याच्या मधुन तापी नदी पुर्वेकडून पश्चिमेस वाहते. या नदीचा उगम मध्यप्रदेश मधील सातपुडा पर्वत रांगेतील “मुलताई” किंवा “बैतुल” येथे होतो. तापी नदी मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या तीन राज्यांतुन वाहते व ती पुढे सुरत, गुजरात येथे अरबी समुद्रास मिळते. तापी नदीची एकूण लांबी ७२० किमी एवढी आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी २०८ किमी एवढी आहे. तापीने उत्तर महाराष्ट्राचा बरासचा भाग व्यापलेला आहे.  तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार इ. जिल्हे येतात. मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर खिंडीमधून महाराष्ट्रातील जळााव जिल्हयातील रावेर शहराजवळ तापी नदी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते.

तापी नदीच्या उपनद्या

पुर्णा (प्रमुख उपनदी), गिरणा, पांझरा, भुलेश्वरी, शहानुर, नंदवान, नळगंगा व मोरणा इ.

पुर्णा नदी

पुर्णा नदी ही तापी नदीची मुख्य उपनदी आहे. पुर्णा नदीचा उगम गाविलगडाच्या डोंगरावर होतो. तापी नदी व पुर्णा नदी या जळगाव जिल्हयातील श्रीक्षेञ चांगदेव येथे संगम पावतात. तापी व पुर्णा नदीचा संयुक्त प्रवाह धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयातुन वाहतो.

पुर्णा नदीच्या उपनद्या

पेढी, नळगंगा, मोरणा व मण

नर्मदा नदी

नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्यप्रदेश मधील सातपुडा पर्वरांगेतील “अमरकंटक” येथे होते. नर्मदा नदीची एकूण लांबी १२९० किमी एवढी आहे व तिची महाराष्ट्रातील लांबी ५४ किमी एवढी आहे. नंदुरबार जिल्हयाच्या अती उत्तरेकडून ही नदी वाहते. नर्मदा नदी सातपुडा पर्वत रांगेतील अक्राणी टेकड्यांमुळे तापी नदी पासुन वेगळी झाली आहे. नर्मदा नदी भडोच, गुजरात येथे अरबी समुद्रास मिळते. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील उपनदी तवा ही आहे. नर्मदा नदीवर “धुवांधार धबधबा” आहे. नर्मदा नदीवरील गुजरात राज्यातील “सरदार सरोवर प्रकल्प” बांधण्यात आला आहे.

कोकणातील महत्वाच्या नद्या

उल्हास नदी

कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून उल्हास नदीस ओळखले जाते. उल्हास नदीची लांबी १३० किमी एवढी आहे. उल्हास नदीचा उगम पुणे ते मुंबई दरम्यान असलेल्या “बोरघाट” येथे होतो.

कोकणातील इतर महत्वाच्या नद्या

साविञी, वशिष्ठी, शास्ञी, सुर्या(ठाणे), वैतरणा, अंबा, काजळी, दमणगंगा, तेरेखोल इ. आहेत.  “दमणगंगा” ही कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे. “तेरेखोल” ही नदी कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. वैतरणा नदीवरील मोडकसागर या धरणातुन मुंबई शहरास पाणी पुरवठा होतो.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...