Monday, 8 November 2021

ऊर्जा ही अदिश राशी आहे

व्याख्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय SI पद्धतीत उर्जेचे एकक जीवन ज्यूल आहे, तर CGS पद्धतीत अर्ग आह विविध क्षेत्रातील ऊर्जेच्या वापरानुसार  एकके बदलत जातात जसे की Kilowatt – Hour, Kilocalories इत्यादी

ऊर्जेचे विविध प्रकार पुढील प्रमाणे आहे

यांत्रिक ऊर्जा
रासायनिक ऊर्जा
Prakash ऊर्जा
उष्णता ऊर्जा
ध्वनि ऊर्जा
भू-औष्णिक ऊर्जा
जलविद्युत ऊर्जा इत्यादी
भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ऊर्जेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ऊर्जेचे विविध प्रकार असले तरी भौतिक दृष्टीने यांत्रिक ऊर्जेत प्रमुख दोन प्रकार पडतात.

गतिज ऊर्जा

व्याख्या पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात.

सूत्र   K.E. = ½ mv2

, वरील सूत्रात m = वस्तुमान (Mass)

v = वेग (Velocity)

उदाहरण व स्पष्टीकरण

1 समजा आपण वाहन चालवताना ब्रेक दाबला तर ज्या ठिकाणी ब्रेक दाबतो तिथेच वाहन थांबत नाही तर थोडे अंतर पुढे जाऊन थांबते कारण त्या वाहनाला गती असते आपण ब्रेक दाबतो म्हणजे गतीला विरोध करतो मात्र वाहनाला प्राप्त गतिज ऊर्जा संपल्या थोडे अंतर पुढे जावे लागते जडत्व

2 लोकल ट्रेनने प्रवास करताना गतिज ऊर्जेचा गमतीशीर अनुभव येतो लोकल ट्रेन काही सेकंदांसाठी रेल्वेस्थानकावर थांबते एवढ्या कमी वेळात उतरणे व चढणे अवघड असते म्हणून उत्तर त्यांना ट्रेनच्या दिशेने धावत उतरावे लागते व चढतानाही ट्रेनच्या दिशेने धावत चढावे लागते स्थिर स्थितीत गतिमान लोकल मध्ये चढताना अथवा उतरतांना अपघाताची दाट शक्यता असते

स्थितीज ऊर्जा

व्याख्या एखाद्या संस्थेतील निरनिराळ्या घटकांच्या परस्पर सापेक्ष स्थितीमुळे वत या घटकांच्या अन्योन्य क्रियांमुळे त्या संस्थेत निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे स्थितिज ऊर्जा होय

सूत्र P. E. =mgh

m = वस्तुमान (mass)

g = गुरुत्व बल ( gravitational force)

h =  उंची (Height)

उदाहरण व स्पष्टीकरण

1)गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी असते त्यात पाणी साठवले जाते या साठलेल्या पाण्यात स्थितिज ऊर्जा असते गावच्या पाईपलाईनचे व्हाॅल्व्ह उघडल्यानंतर साठलेले पाणी वेगाने गावातील घराघरात पोहोचते.

साठलेल्या पाण्यातील स्थितिज ऊर्जा = पाण्याचे वस्तुमान (m) * गुरुत्व बल (g) * टाकीची उंची (h) = mgh.

2) चावीचे घड्याळ जुन्या काळातील चावीच्या घड्याळाला चावी दिल्यानंतर घड्याळातील काट्यांचा स्प्रिंग गुंडाळला जातो यामुळे त्या स्प्रिंगमध्ये स्थितिज ऊर्जा साठवली जाते नंतर याच ऊर्जेचे रूपांतर घडाळ्याच्या काट्यांना गती देतांना गतिज ऊर्जेत होते

3 बॉम्ब मधील स्फोटक


नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत

दोन कृत्रिम ऊर्जास्त्रोत असे दोन प्रकार पडतात तसेच ऊर्जास्त्रोतांचा निर्माणा नुसार दोन गट पडतात

1 पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत

ज्या ऊर्जा स्रोतांपासून पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येते अशा उर्जा स्त्रोतांना  पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.

उदाहरण 1 सौर ऊर्जा

2 पवन ऊर्जा

3 लाटांपासून ऊर्जा

4 भू-औष्णिक ऊर्जा

5 जैविक ऊर्जा

या उर्जास्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात

या प्रकारांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा भोजने kurja इत्यादींचा समावेश होतो

पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचे फायदे

1 या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा अखंड मिळत राहणार आहे

2 या प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबदला अथवा गुंतवणूक करावी लागत नाही 3 प्रकारच्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण होत नाही

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...