महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम -७ (३) नुसार प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.
तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असून तो गावस्तरावरील अतिशय महत्वाचा घटक मानला जातो.
– भारतामध्ये सर्वप्रथम १९१८ साली कोल्हापूर संस्थानिकांमध्ये राजश्री शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी हे पद निर्माण केले.
– तलाठी यांच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात.
– १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महाराष्ट्राचे महसूल वर्ष आहे.
पात्रता तो व्यक्ती पदवीधर असावा.
तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा
निवड - जिल्हा निवड समितीद्वारे
नेमणूक - जिल्हाधिकारी
दर्जा - वर्ग – ३चा कर्मचारी
कार्यक्षेत्रे - गाव ( सज्जा )
वेतन श्रेणी - ५२०० ते २०,८०० अधिक ग्रेड पे – २४०० रु.
नियंत्रण - मंडळ अधिकारी व तहसीलदार
राजीनामा - जिल्हाधिकारी
बडतर्फी - जिल्हाधिकारी
👍
ReplyDelete