Saturday, 6 June 2020

सूर्यावरील सूक्ष्म विस्फोटांचा लागला शोध.


🔰पुण्यातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए- टीआयएफआर)च्या नॅशनल सेंटर फॉर स्ट्रोफिजिक्समधील वैज्ञानिकांनी सूर्याच्या सर्व भागांवर होणाऱ्या छोट्या विस्फोटातून निघणाऱ्या सूक्ष्म रेडिओ प्रकाशझोतांचा शोध लावला आहे.

🔰तर या संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी प्रथमच जगासमोर चुंबकीय विस्फोटाचे धूम्र लोट आढळून येत असल्याचे पुरावे मांडले आहे.

🔰तसेच ”एनसीआरए मधील प्रा.दिव्य ओबेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत असलेला विद्यार्थी सुरजित मोंडल व डॉ. अतुल मोहन या शास्त्रज्ञांच्या गटाने हे संशोधन केले आहे.

🔰‘मर्चीसन वाइल्ड फिल्ड रे (एमडब्ल्यूए)’या दुर्बिणीतून घेतलेल्या डाटा व एनसीआरए मध्ये तयार केलेल्या आधुनिक तांत्रिक प्रणालीच्या सहाय्याने हा शोध लावला आहे.

🔰सूर्याच्या पृष्ठभागावर अंदाजे दोन दशलक्ष अंश तापमानाचा म्हणजेच सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा 300 पट जास्त उष्ण वायूचा एक थर असतो.या थराची झलक संपूर्ण खग्रास सूर्यग्रहणादरम्यान आपल्याला पाहता येते

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...