पवन ऊर्जानिर्मिती मागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पृथ्वीवरील वातावरण होय. पृथ्वीवर विषुववृत्ताच्या जवळपास चा भाग तापलेला असतो, तर ध्रुवीय भाग थंड असतो यामुळे हवेच्या दाबामध्ये फरक पडतो आणि हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते
पूर्वीपासून या पवन उर्जेचा उपयोग जहाजांना दिशा देण्यासाठी धान्य दळण्यासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी केल्या जात जायचा आता पवन ऊर्जेचे उपयोग वीजनिर्मितीसाठी केला जात आहे लहान मुलांचे आवडते खेळणे म्हणजे फिरकी ही firki पवनचक्की निर्मितीचे निमित्त ठरले एका अंदाजानुसार जगामध्ये पवन ऊर्जेपासून दर वर्षी 1750 ते 2200 हजार अब्ज व्हॉट इतक्या प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती होऊ शकते हे प्रमाण पृथ्वीवरील आजच्या एकून ऊर्जावापराच्या 2.7 पट आहे
ज्या क्षेत्रामध्ये पवनचक्क्या मोठ्या प्रमाणात असतात त्या क्षेत्राला पवनचक्क्यांची शेती किंवा पवन ऊर्जेची शेती असे म्हटले जाते भारतातील सर्वात मोठे पवन ऊर्जा क्षेत्र तामिळनाडू कण्याकुमारी जवळ आहे मार्च 2017 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 32.3 GW (32287 मेगावॉट झालेली आहे
पवन ऊर्जा वापरातील मर्यादा
पवन ऊर्जा निर्मितीसाठी ज्या ठिकाणी सातत्याने वारा वहात असेल अशाच ठिकाणी प्रकल्प उभारला उभारता येतो
पवनचक्कीच्या प्रभावी वीज निर्मितीसाठी वाऱ्याची चाल 15 किलोमीटर परावाळ किमान असली पाहिजे परंतु इतकी चाल सातत्याने नसते
एक मेगावॅट इतक्या प्रमाणात वीज निर्मिती करावयाची असेल तर िमान दोन हेक्टर एवढे क्षेत्रावर पवन उर्जा शेती असावी
पवन ऊर्जा प्रकल्प उभारणी आर्थिक दृष्ट्या महाग आहे
वादळी पाऊस भूकंप ऊन पाऊस यामुळे पवनचक्कीचे पाती तुटल्यास पुनर्उभारणी खूप महाग असते
पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पावसावर परिणाम होतो
भारतातील पवन ऊर्जा
31 डिसेंबर 2014 अखेर भारतातील पवन ऊर्जेचे उत्पादन क्षमता 22462 मेगावॉट झालेली आहे पवन ऊर्जा बाबतची अमेरिका जर्मनी स्पेन नंतर भारताचा जगात पाचवा क्रमांक लागतो परंतु 2017 अखेर ही क्षमता 32 हजार मेगावॅट पेक्षा जास्त आहे
2 पवन ऊर्जेच्या संशोधन व तंत्रज्ञान यासाठी चेन्नई येथे C-WET (Centre for Wind Energy Technology) उभारण्यात आलेले आहे
3 सध्या तामिळनाडू सर्वाधिक पवन ऊर्जानिर्मिती केंद्रे आहेत तामिनाडू पवन ऊर्जा निर्मितीत आघाडीवर असून तेथून 51% पवन ऊर्जानिर्मिती होते अधिक क्षमतेचे पवन ऊर्जा केंद् महाराष्ट्रातील वनकुसवडे जिल्हा सातारा येथे असून त्याची स्थापित क्षमता 259 मेगावॉट आहे धुळे जिल्ह्यातील ब्राह्मणवेल येथे 545 मेगावॉट क्षमतेचे सर्वात मोठा पवन ऊर्जा केंद्र उभारले जात आहे
4 भारतात पाहणीनुसार 1 0 2 788 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती पवनऊर्जेतून निर्माण होऊ शकते
3 सागरी ऊर्जा लाटांपासून ऊर्जा
चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राच्या पृष्ठभागाची उंची कमी-जास्त होते त्यामुळे लाटांची निर्मिती होते या लाटांपासून ऊर्जा निर्मिती करता येते चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा गुरुत्व बलामुळे उंच लाटांची निर्मिती होते तसेच गुरुत्व बल कमी झाल्यावर कमी उंचीच्या लाटा निर्माण होतात लाटांच्या या उसळल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर
मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते ठिकाणी समुद्र रुंद असतो त्याठिकाणी धरणाची उभारणी करून विज निर्मिती करता येते
त्यांची उंचीही नेहमी टर्बाइन्स फिरणे इतपत असेलच असे नाही त्यामुळे काही मर्यादित ठिकाणीच अशा धरणांची उभारणी करता येते यामुळे लाटांपासून वीजनिर्मिती हा खूप मोठा पर्याय ठरत नाही
No comments:
Post a Comment