Tuesday, 1 March 2022

संसदेविषयीे काही शब्दावली


1) गणपूर्ती (Quorram) :-

◆ कलम 100 अनुसार सदनाच्या बैठकी करिता गणपूर्तीची आवश्यकता असेल.

◆ लोकसभा भरण्याकरिता एकूण सदस्यसंख्येच्या 1/10 म्हणजेच 55 सदस्यांची गरज असेल तर राज्यसभा भरण्याकरिता 25 सदस्यांची गरज असेल यालाच गणपूर्ती म्हणतात.
---------------------------------------------------
2) प्रश्न काळ (Question Hour) :-

◆ याचा संबंध त्यावेळी आहे ज्याद्वारे संसद सदस्य लोक महत्त्वाच्या कोणत्याही बाबींवर मंत्री परिषदेला प्रश्न विचारतात.

◆ हा सुरुवातीचा एक तासाचा काळ असतो यामध्ये चार प्रकारचे प्रश्न विचारले जातात
---------------------------------------------------
A. तारांकित प्रश्न:–

या प्रश्नांच्या सुरवातीला * असे चिन्ह असते म्हणून त्यास तारांकित प्रश्न असे म्हणतात.

असे प्रश्न ज्यावर विचारणारा तात्काळ उत्तर मौखिक स्वरूपात मंत्री परिषदेतील सदस्यांद्वारे देण्याची अपेक्षा करीत असतो.

◆ या प्रश्नाचे उत्तरावर अनुसरून इतर प्रश्नही विचारले जाऊ शकतात. कागदावर लिहून प्रश्न विचारतात. त्वरित उत्तर द्यावे लागते.

◆ पीठासीन अधिकाऱ्यास वाटल्यास ते तारांकित प्रश्नांचे रूपांतर अतारांकित प्रश्नात करू शकतात.
---------------------------------------------------
B. अतारांकित प्रश्न:-

◆ या प्रश्नांच्या समोर * हे चिन्ह नसते.

◆ हे प्रश्न लिखित स्वरूपात विचारले जातात व याचे उत्तरही लिखित स्वरूपात द्यावे लागते.

◆ आकडेवारी, दीर्घ तपशील असणारे हे प्रश्न असतात.
---------------------------------------------------
C. अल्प सूचना प्रश्न:- 

◆ यामध्ये उत्तर देण्याकरिता दहा दिवसांची कालावधी दिली जाते.

◆ सर्वसाधारण प्रश्नांसाठी १० दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते. परंतु अल्पसुचनावधी प्रश्नांना त्यापेक्षा कमी दिवसांची सूचना दिली जाते. हे प्रश्न तातडीचे व सार्वजनिक महत्वाचे असतात.

◆ पीठासीन अधिकाऱ्यांचा व संबंधित मत्र्यांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही सदस्य कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारू शकत नाही. आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे अशा अर्थाची सूचना सदस्याने संबंधित सभागृहाच्या महासचिवाला द्यावी.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल, त्या दिवसापूर्वी १० दिवसापेक्षा जास्त व २१ दिवसापेक्षा कमी अशा कालावधीत हि सूचना महासचिवांना मिळावयास हवी.
---------------------------------------------------
D. गैर सरकारी सदस्यास विचारले जाणारे प्रश्न
---------------------------------------------------
3) शून्य काळ :-

◆ संसदेच्या दोन्ही सदनामध्ये प्रश्न काळ नंतर तात्काळ असणाऱ्या वेळेस शून्य काळ असे म्हटले जाते. हा 12 वाजता सुरू होतो व 1 वाजेपर्यंत चालते व त्यावर तुरंत कार्यवाही करणारे अपेक्षित प्रश्न विचारले जातात.
---------------------------------------------------
4) स्थगन (Adjournment) :-

◆ स्थगन प्रस्ताव हे अध्यक्ष (लोकसभेचे अध्यक्ष ) महोदयांद्वारे केले जातात.

◆ याचा अर्थ सभागृह निश्चित काळासाठी बरखास्त केल्या जाते. (तास, दिवस)
---------------------------------------------------
5) स्थगन अनिश्चित काळ (Prorogation) :-

◆ हे अनिश्चित काळासाठी स्थगन राष्ट्रपतीद्वारे केले जाते जसे बजेट सेशन नंतर माॅन्सून सेशन च्यामधील दिवस.

◆ माॅन्सून सेशन संपल्यानंतर हिवाळी अधिवेशन चालू होण्याच्या पूर्वीचे दिवस
---------------------------------------------------
6) विघटन (Dissolution) :- 

◆ राज्यसभेचे विघटन कधीच होत नाही कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे.

◆ लोकसभेचे विघटन केले जाते व यानंतर निवडणुका होतात.

◆ बजेटच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती येऊन म्हणतात आता गृह पुढचे session अनिश्चित काळासाठी स्थगित झाले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...