Monday, 29 June 2020

सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली.

🔰अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

🔰त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.

🔰या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश  होता.

🔰2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.

🔰सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...