Friday, 5 June 2020

शिखांची पाच तख्ते आहेत.

१) अकाल तख्त (अमृतसर)

२) तख्त श्री हरिमंदिरसाहेब (पटणा साहेब)

३) तख्त श्री केशगढसाहेब (आनंदपूर)

४) तख्त श्री दमदमासाहेब (तळवंडी साबो)

५) तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब (नांदेड).

🧩यांपैकी अकाल तख्त हे सर्वांत श्रेष्ठ मानले जाते.

🅾खालसा पंथासाठी कुठलाही हुकूमनामा जारी करण्यापूर्वी पाच तख्तांचे जथेदार एकत्र बसून विचार-विनिमय करतात.

🅾 कुठल्याही एका जथेदाराला हुकूमनामा जारी करण्याचा अधिकार नाही.

🅾गुरुद्वाराचे प्रशासकीय कामकाज शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीद्वारा करण्यात येते.

🅾पाच तख्तांचे जथेदार या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच दिल्लीच्या गुरुद्वाराचे प्रशासकीय काम दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समिती बघते.

🅾शिरोमणी अकाली दल राजकीय बाबींत निर्णय घेते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment