Thursday, 25 June 2020

बिरसा मुंडा

◆ बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झाला.

◆ त्यांचे शिक्षण जर्मन मिशन स्कूल मध्ये झाले.

◆ सगळ्यांमध्ये मिळून- मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरूण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

◆ बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे.

◆ त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकार्‍यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात त्यांनी छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.

◆ भगवान बिरसा मुंडांनी हिन्दू धर्म व भारतीय संस्कृतीसाठी खूप कार्य केले. अनेक चमत्कार केले.

◆  त्यांच्या केवळ स्पर्शाने अनेकांना रोगमुक्त केले. अध्यात्मिक शक्तींमुळे त्यांना ‘भगवान’ मानले जाऊ लागले .

◆ त्यांच्या प्रभावाने ख्रिस्ती धर्मांतर थांबले व अनेकांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला.

◆ इंग्रजांनी त्यांना अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला.

◆ ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.

◆ बिरसा मुंडा यांना जननायक असे म्हटले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...