Tuesday, 23 June 2020

अमेरिकेनंतर ब्राझिल ठरतोय करोनाचा नवा हॉस्पॉट.


🔰जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे.

🔰अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे.

🔰ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही.

🔰एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे.

🔰तर मागील 24 तासांत ब्राझिलमध्ये 1022 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰तसेच ब्राझिलमध्ये आतापर्यंत 50 हजार 629 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

🔰गेल्या 24 तासांत ब्राझिलमध्ये 34 हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.तसेच देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 10 लाख 90 हजार झाली आहे.

🔰ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख 22 हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment