Sunday, 21 June 2020

दहावीच्या अभ्यासक्रमात होणार हे बदल.

🔰कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंळाने दहावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे एनसीईआरटीद्वारे अनेक प्रकरणांचे रूपांतर सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्प स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.

🔰सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. मात्र, सीबीएसईने भविष्याचा विचार करीत, अभ्यासक्रमात बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली  होती.त्यामुळे य विषयावर आधारित प्रश्‍न परीक्षेत विचारण्यात येणार नाही. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे.

🔰यात प्रामुख्याने इतिहासामधील “द एज ऑफ इंडस्ट्रीयलायझेशन, गणितामधील “एरिया ऑफ ट्रॅगल ऍन्ड फ्रुस्टम ऑफ कोन’, विज्ञानामधील “फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍन्ड नॉन मेटल्स आणि टिंडल इफेक्‍ट यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...