🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२३ जून २०२०
अलंकारिक शब्द
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (P...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा