1. आरोह पाऊस (Conventional Rainfall)
सूर्याच्या उष्णतेने जमिनीलगत हवा तापते व प्रसरण पावते. ही प्रसरण पावलेली हवा हलकी होऊन वातावरणात वरच्या दिशेने चढू लागते वर जात असताना हवेचे तापमान कमी होत जाते व विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर क्युमिल्स निंबल्स नावाच्या ढगात रूपांतर होते व हे ढग त्या क्षेत्राला पाऊस देतात व यालाच आरोह पाऊस म्हणतात.
उदाहरण:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत अशा प्रकारचा पाऊस पडतो.
2. प्रतिरोध पाऊस
समुद्रावरून पाहणाऱ्या बाष्पयुक्त हवेच्या मार्गात पर्वत आडवे आल्यास बाष्पयुक्त हवा अडवली जाते आणि त्यामुळे पर्वतावर पाऊस पडतो.
पर्वताच्या उतारावर जोरदार वृष्टी होते त्याच प्रतिरोध प्रकारचे पाऊस असे म्हणतात
महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताच्या उतारावर अशा प्रकारची पाऊस पडतो.
3. कृत्रिम पाऊस
पर्जन्य योग्य ढगांमध्ये विशिष्ट रसायनांची फवारणी करून निसर्गात पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद रीतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम वर्षा होय.
यात प्रथम ढगांचे तापमान मोजली जाते.
0°C पेक्षा जास्त तापमान असणारे उष्ण ढग व 0°C पेक्षा कमी तापमान असणारे शित ढग या ढगांवर सोडियम क्लोराइड घनरूप कार्बन-डाय-ऑक्साईड सिल्व्हर आयोडाईड ढगांच्या तळाशी करतात.
उष्ण ढगांपेक्षा शीत ढगांमधून अधिक पाऊस मिळतो.
महाराष्ट्र सर्वप्रथम हा प्रयोग 2003 मध्ये करण्यात आला होता.
दुष्काळ
दुष्काळ म्हणजे एखाद्या वर्षाचा एखाद्या भागात 75% पेक्षा कमी पाऊस होणे.
जर पावसाचे प्रमाण 26% – 50% ने कमी झाले असेल तर मध्यम दुष्काळ समजला जातो.
जर सरासरी 50% पेक्षा कमी पाऊस झाल्यास तीव्र दुष्काळ समजला जातो.
महाराष्ट्रात अक्षांश विस्तार 15° उत्तर ते 22° उत्तर अक्षवृत्त असा आहे.
याचा अर्थ महाराष्ट्र उष्णकटिबंधीय हवामानात मोडला जातो.
म्हणून महाराष्ट्रात उन्हाळा पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू आढळून येतात.
हवामानाच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र हा उष्ण कटिबंधीय मोसमी हवामानाच्या प्रदेशात येतो
महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक
महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना पश्चिमेला असणार्या अरबी समुद्र, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार नैऋत्य व ईशान्य मौसमी वारे व पूर्वेकडील पठारी प्रदेश या घटकांचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होत असतो.
No comments:
Post a Comment