२९ नोव्हेंबर २०२१

अर्थसंकल्प

🅾अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलीत आहे ,बजेट हा शब्द फ्रेंच (Bougette म्हणजे पर्स,पिशवी  ) या शब्दापासून आलेला आहे ,अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन.

🅾ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात.

🅾प्रत्येक आस्थापन म्हणजे देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायतही आपला अ बजेट मध्ये शासनाच्या पुढील वर्षांच्या उत्पन्न आणि खर्च याचा लेखा मांडला जातो.

🅾शासनाचे खर्च तीन खात्यांमध्ये मध्ये विभागलेले असतात:

१. भारताचे सामायिक खाते  

२. आपत्कालीन निधी खाते आणिअर्थसंकल्पातील उत्पन्न आणि

🧩खर्चाचे दोन मुख्य भागात वर्गीकरण होते.

१. महसुली उत्पन्न आणि खर्च

२. भांडवली उत्पन्न आणि खर्च शासनाच्या रोजच्या व्यवहारातून येणारे उत्पन्न, जसे कर उत्पन्न हे महसुली उत्पन्न म्हणून धरले जाते. तसेच रोजच्या खर्चाला, जसे कर्जावरील व्याज, अनुदान याला महसुली खर्च असे म्हणतात. शासनाला रिझर्व बँक, जनता आणि इतर स्वरुपात मिळणाऱ्या कर्जाला भांडवली उत्पन्न असे म्हणतात..

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...