Thursday 25 June 2020

महाराष्ट्राचे हवामान

हवामानाची संकल्पना

वातावरण

पृथ्वीभोवती अनेक वायू पाण्याची वाफ धूलिकण इत्यादींनी बनलेले जे आवरण आहे त्यालाच वातावरण असे म्हणतात

हवामान

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान आर्द्रता वाऱ्याचा वेग हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे हवामान होय

विषम हवामान

उन्हाळ्यात अधिक उष्ण तर हिवाळ्यात अधिक थंड अशा भागाचे हवामान विषम हवामान म्हणतात

उदाहरण:- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा

सम हवामान

उन्हाळ्यात सौम्य तर हिवाळ्यातही सोमी अशा प्रकारच्या हवामानाला सम हवामान म्हणतात

उदाहरण:- कोकण किनारपट्टी

महाराष्ट्र उष्ण कटिबंधीय मोसमी वार्‍याच्या प्रदेशात येतो

तापमान कक्षा

कमाल तापमान (दिवसाचे) व किमान तापमान (रात्रीचे) यातील फरक म्हणजेच तापमान कक्षा होय.

दैनिक तापमान कक्षा

दिवसभरातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय.

टीप:- उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वाधिक असते तर हिवाळ्यात सर्वात कमी असते.

वार्षिक तापमान कक्षा

वर्षातील कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा होय.

महाराष्ट्रातील पूर्वेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा जास्त (अधिक) असते तर पश्चिमेकडील भागात वार्षिक तापमान कक्षा कमी असते.

आर्द्रता (Humidity)

वातावरणात बाष्पाचे प्रमाणावर आर्द्रता ठरवली जाते

महाराष्ट्रात पश्चिमेला लागून अरबी समुद्र असल्याने पश्चिम किनारपट्टीला आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे.

जून ते ऑक्‍टोबरच्या दरम्यान ना प्रमाण जास्त तर हिवाळा व उन्हाळ्याच्या काळात कमी असतो

No comments:

Post a Comment