Tuesday, 1 March 2022

वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक


🧩नाणे बाजार ( Money Market)-

🅾नाणे बाजार ही अल्प मुदतीच्या पत साधनाची खरेदी करणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे अल्प मुदतीची कर्जे मागणा-यांची मागणी पुर्ण केली जाते.तसेच धनकोंना रोखता व उत्पन्न प्राप्त करुन दिले जाते.

🧩नाणे बाजारातील उप बाजार

१.     अल्प सूचना किंवा मागणी कर्ज बाजार (CMM) – यात २४ तास ते ७ दिवसांपर्यंतची कर्जे देतात. स्टेट बँक ऑफ इंडिया यात धनकोची भुमिका बजावते.

२.     ट्रेझरी बिल्स बाजार (TBM) - रिझर्व बँक ऑफ हा यातील मोठा खरेदीदार आहे.

३.     हुंडी बाजार

४.     सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटस् बाजार (CD) - हे साधन बँकांसाठी १९८९ व वित्त संस्थासाठी १९९३ ला उपलब्ध झाले. याची शिफारस १९८२ च्या तांबे समितीने केली होती. १९८७ च्या वाघुळ समितीच्या शिफारशीने सुरुवात झाली.

५.     कमर्शिअल पेपर बाजार (CP) – नोंदणीकृत कंपन्यांना आपल्या खेळत्या भांडवलाची गरज पुर्ण करण्यासाठी १९९३ पासुन सुरुवात.

६.     मनी मार्केट म्युच्युएल फंड (MMMF) – यात स्टेत बँक व तीच्या सहयोगी बँकांना १९८७ मध्ये खाजगी कंपन्यांना १९९३ मध्ये व्यवहारास प्रवेश मिळाला.

७.     डिस्काउंट अँन्ड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया  (DFHI-१९८८) (वटावगृह)

🅾भारतीय नाणे बाजाराची रचना

🧩नाणे बाजार

संघटीत क्षेत्र                                                असंघटीत क्षेत्र

🧩रिझर्व बँक ऑफ इंडिया (सर्वोच्च संस्था)

१) व्यापारी बँका                                          १) सराफी पेढ्या

२) विकास बँका                                          २) सावकार

३) सहकारी बँका                                         ३) अनियंत्रित बिगर बँकींग वित्तीय संस्था

४)गुंतवणूक संस्था-बचत बँका, पोस्ट ऑफिस म्युच्यूअल फंड, एलआयसी

🧩बँकिंग क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान-

१.     संगणकीकरण – व्यापारी बँकांच्या संगणकीकरणास १९९३ ला सुरुवात झाली.

२.     एम. आय. सी. आर. समाशोधन पध्दती- १९८७ पासून रिझर्व्ह बँकेने एम. आय. सी. आर. तंत्रज्ञानाची ( Magentic Ink Character Recongnition Technology)

धनादेश देवघेवीसाठी अवलंब सुरु केला.

३.     इलेक्ट्रॉनिक समाशोधन सुविधा – १९९६-९७ पासून रिझर्व्ह बँकेने ही सुविधा विभिन्न संस्थासाठी सुरु केली.

४.     इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण पध्दती (EFT System) – ही निधी स्थानांतरण सुविधा १९९६ पासून करण्यात आली असून मुंबई, मद्रास या दोन शहरांमध्ये कार्यान्वित करण्यात आली.

आरबीआय आयनेटद्वारा ही सुविधा पुरविते. मार्च१९९९ पासून ही सुविधा सर्व अनुसूचित बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली.

५.     स्वयंप्रदान पध्दती (ATM) – व्यापारी बँकांच्या अनेक शाखांनी मोठ्या प्रमाणावर ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या १००००/- रुपये पर्यंतची रक्कम विनामुल्य कोणत्याही बँकेच्या एटीएम मधुन काढता येते.

६.     एस. पी. नेटवर्क पध्दती (Shared Payment Network System/SPNS) – मुंबईमध्ये एस. पी. नेटवर्क पध्दती १ फेब्रुवारी १९९७ पासून सुरु करण्यात आली. इंडियन बँक असोशिएशनने हे नेटवर्क स्थापन केले असून मुंबईतील सभासद बँकांचे सर्व एटीएम केंद्र या नेटवर्कला जोडले आहे.

७.     स्वीफ्ट नेटवर्क – भारतातील ८८ बँका स्वीफ्ट नेटवर्कशी जोडल्या गेल्या आहेत. स्वीफ्ट म्हणजे (Society for World wide Interbank Financial Tele Communication/ SWIFT)  होय. ही संस्था आंतरराष्ट्रीय संदेशवहन नेटवर्क चालविते व त्याद्वारे जगातील सदस्य बँकांशी वित्तीय संदेशवहन करण्याची महत्वपुर्ण सेवा उपलब्ध होते.

८.     EDI / Electronic Data Enterchange-

९.     बँकिंग तंत्रज्ञान विकास व संशोधन संस्था (Instititute for Development & Research in Banking Technology / IDRBI) रिझर्व्ह बँकेने या संस्थेची स्थापना १९९६ ला हैद्राबाद येथे केली.

१०.इंटरनेट वेबसाईट (Internet Website) – १७ सप्टेंबर १९९६

११.भारतीय वित्तीय नेटवर्क: इंफिनेट (Indian Financial Network # INFINET) – जुन १९९९ ला हा कार्यक्रम सुरु झाला. आरबीआय व आयडीआरबीआय या दोन संस्थानी संयुक्तपणे इंफिनेट सुरु केले आहे.

१२.उपग्रह आधारित नेटवर्क (Setelite – based Wide Area Network / WAN) – उपग्रह आधारित व्यापक क्षेत्रिय नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या संदर्भात एका करारावर फेब्रुवारी १९९८ मध्ये सह्या झाल्या आहेत.

🧩भांडवल बाजार

1. भांडवल बाजार म्हणजे अशी यंत्रणा किंवा संघटना की जिच्यामार्फत दिर्घ मुदतीचे भंडवल गरजू व्यक्ती, सरकार किंवा संस्था यांना मिळू शकते.

🧩भारतातील विकास बँका

🅾जगातील पहिली विकास बँक – सोसायटी  जनरल द बेल्जीक, बेल्जियम (१९२२)

🅾आशियातील पहिली विकास बँक – इंडस्ट्रियल बँक ऑफ जपान , १९०२

🅾भारतातील पहिली विकास बँक – टाटा औद्योगिक बँक १९१७

🅾कोलकाता औद्योगिक बँकेची स्थापना १९१९ मध्ये कर

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...