Tuesday, 16 June 2020

आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम.


◾️या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे.

◾️जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

◾️मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते.

◾️विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.

◾️भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे.

◾️भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

◾️२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि👍 रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.


 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...