Thursday, 11 June 2020

अमृत अभियानातील दहा पाणीपुरवठा प्रकल्पांचे ई -भूमिपूजन.


🅾मुंबई - राज्याच्या सकल उत्पन्नात शहरांचा मोठा वाटा आहे . शहरे ही ग्रोथ इंजिन असल्याने विविध योजनांच्या माध्यमातून शहरांच्या शाश्वत विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे .

🅾 या योजनांच्या माध्यमातून पुढील तीन - चार वर्षांमध्ये शहरे निश्चितपणे बदललेली दिसतील , असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल येथे व्यक्त केला . वर्षा निवासस्थानी अमृत अभियानातील 10 पाणीपुरवठा प्रकल्पांचे ई - भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले , त्या वेळी ते बोलत होते .

🅾या वेळी मुख्यमंत्री म्हणाले , राज्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे . राज्यातील 50 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते . शहरांकडे लोकांचा ओढा वाढत राहिल्यामुळे आणि शहरांचे विकासाचे नियोजन नसल्यामुळे शहरे बकाल झाली आहेत .

🅾 या शहरांचा नियोजनबद्ध विकास करताना पाणीपुरवठ्याच्या योजना , मलनिस्सारण , घनकचऱ्याचे व्यवस्थापन यालाही प्राधान्य दिले पाहिजे. शहरीकरण ही संधी आहे , असे समजून या संधीचे रूपांतर विकासात केले पाहिजे. शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .

🅾 यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी , अमृत ( अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ) या योजना राबविण्याचे ठरविले आहे . या विविध योजनांच्या माध्यमातून राज्यातील शहरांच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे .

🅾 राज्याच्या अमृत योजनेचा 7500 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केला असून , केंद्र शासनाकडून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे . दोन वर्षांत अमृत योजनेच्या माध्यमातून राज्यात 2500 कोटींची कामे सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले .

🅾या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अमृत योजनेअंतर्गत 2015 - 16 या वर्षात मंजूर करण्यात आलेल्या वसई विरार , अमरावती , मालेगाव, सोलापूर , उस्मानाबाद , पनवेल , लातूर , वर्धा , अचलपूर , सातारा या 10 शहरांच्या 632 कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पांचा व 63 कोटी रुपयांच्या रत्नागिरी नगरोत्थान योजनेचे ई -भूमिपूजन करण्यात आले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...