Friday, 26 June 2020

सार्क संघटना.


🅾2015 मध्ये सार्क संघटनेची 18 वी परिषद नेपाळ मध्ये पार पडली व ती शेवटची ठरली .

🅾त्यानंतर 19 वी परिषद पाकिस्तानमध्ये होणार होती पण ती भारत ,बांगलादेश ,भूतान च्या बहिष्कारामुळे रद्द करावी लागली .

🅾या संघटनेला आता उतरती कळा लागली आहे .निर्धारित केलेले उद्दिष्टे पूर्ण करण्यात ही संघटना पूर्णतः अपयशी ठरली आहे .

💠💠सार्क.💠💠

🅾च्या इतर सदस्यांच्या तुलनेत भारत सर्व दृष्टीने मोठा आहे. दक्षिण आशिया उपखंडाच्या एकूण आकारमानापैकी एकट्या भारताचे आकारमान सत्तर टक्के एवढे आहे. स्वाभाविकपणे भारताचा या संघटनेवर प्रभाव आहे.

🅾भारताच्या खालोखाल पाकिस्तानचे आकारमान येते. याचाच अर्थ असा की या दोन राष्ट्रांनी सार्कच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणे अपेक्षित होते....पण तसे घडले नाही.

💠💠सार्कची संस्थात्मक रचना.💠💠

🅾सार्कच्या संस्थात्मक रचनेत सर्वोच्च स्थानी सदस्य राष्ट्रांच्या द्विवार्षिक बैठकांचा समावेश होतो. त्याखालोखाल सार्कच्या मंत्रिमंडळाचे स्थान आहे.

🅾 मंत्रिमंडळात सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांचा समावेश होतो. तिसऱ्या स्थानावर सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र सचिवांची कार्यकारी समिती आहे. ही समिती वर्षातून दोनदा भेटते.

🅾त्याखालोखाल चौथ्या स्थानावर अनेक विषय व कृती समित्या आहेत. सार्क संघटनेचे कायमस्वरूपी सचिवालय आहे. महासचिव सचिवालयाचा प्रमुख म्हणून काम पाहतात.

💠💠सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी.💠💠

🅾लोकसंख्या २१.३ टक्के 

🅾सकल गृह उत्पन्न १.३ टक्के 

🅾निर्यात ०.९ टक्के 

🅾आयात १.० टक्के 

🅾अन्नधान्याचे उत्पादन ९.७ टक्के 

🅾आंतरविभागीय व्यापार ३.४ टक्के 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...