▫️ यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले.
▫️शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते.
▫️ इ.स. १७९६ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिसयाचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.
▫️ इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
▫️इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.
No comments:
Post a Comment