Saturday, 6 June 2020

जिवाणू (bacteria)

- साधारण एक पेशीय असतात
- विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात
- जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात
- जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात
- पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होतात जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात
- जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात.
- एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे.

● फायदेशीर जिवाणू

- शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीची साठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात
- मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात.
- लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही

● घातक जीवाणू

- स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात
- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते
- जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते
- क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात
- बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो

● कॉलरा (cholera)

- जिवाणू चे नाव -   विब्रिओ कॉलरी
- प्रसार - दूषित अन्न पाणी
- मोठी अवयव - मोठी आतडे
- लक्षणे -  उलट्या-जुलाब शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे त्वचा सुखणे
- उपचार - 1)औषध - ओ आर एस (ORS)
- लस - हाफकिन ची लस ORS चे घटक
1) सोडियम क्लोराइड 2)ग्लूकोज 3)पोटॅशियम क्लोराइड 4) ट्रायसोडियम सायट्रेट
- शिगेल्ला  बॅसिलस हा जिवाणू हा हागवणीस कारणीभूत ठरतो

● घटसर्प

- जिवाणू चे नाव -  कॉनिऺबॅक्टेरियम डिप्थेरी.
- प्रसार -  हवेमार्फत द्रवबिंदू च्या स्वरूपात
- अवयव - श्‍वसनसंस्था
- लक्षणे - श्वासोच्छ्वासाचा त्रास होणे घसा लाल होणे
- उपचार -  पेनिसिलिन लस. DPT ( त्रिगुणी लस)

● डांग्या खोकला.

- जिवाणू चे नाव - haemophilus pertusis
- प्रसार - हवेमार्फत
- अवयव - श्वसनसंस्था
- लक्षणे - तीव्र खोकला छातीत दुखणे
- उपचार - DPT (त्रिगुणी लस)

● धनुर्वात (tetanus)

- जिवाणू चे नाव - काॅस्ट्रिडियम टिटॅनी
- प्रसार - ओल्या जखमेतून
- अवयव -  मध्यवर्ती चेतासंस्था
- लक्षणे - दातखिळी बसणे ताप तीव्र वेदना
- उपचार -  DPT लस

● न्युमोनिया

- जिवाणू चे नाव -  डीप्लोकोकस न्युमोनी
- प्रसार -  हवेमार्फत
- अवयव ,- फुप्फुसावर सूज येणे
- लक्षणे - छातीत दुखणे श्वसनासाठी त्रास
- उपचार - औषध पेनिसिलीन

● कुष्ठरोग

- जिवाणू चे नाव - मायकोबॅक्टेरियम लेप्री
- प्रसार - संपर्क रक्त द्रव्यबिंदू
- अवयव -  परिघीय चेता संस्था
- लक्षणे -   बोट झडणे सुरकुत्या पडणे त्वचेवर चट्टे पडणे
- उपचार - लस उपलब्ध नाही

No comments:

Post a Comment