◆ सन 1930, 1931 व 1932 या तीन वेळा भरलेल्या गोलमेज परिषदेच्या चर्चेवर आधारित 1933 मध्ये श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आणि या श्वेतपत्रिकेवर आधारित 1935 चा भारत सरकार कायदा पास करण्यात आला.
■ या कायद्याची वैशिष्टे-
◆ भारतात संघराज्य पद्धती स्वीकारण्यात आली.
◆ प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली व प्रांतिक शासनाचा कारभार भारतीयांकडे सोपविण्यात आला.
◆ संपूर्ण विषयाच्या 1) मध्यवर्ती सूची 2) प्रांतिक सूची 3) समवर्ती सूची अशा तीन सूची तयार करण्यात आल्या. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ भारत मंत्र्याला सल्ला देण्याकरिता तयार करण्यात आलेले इंडिया कौन्सिल रद्द करून त्या ठिकाणी सल्लागार मंडळाची निर्मिती करण्यात आली.
◆ त्याचप्रमाणे भारतमंत्र्याचे अधिकार कमी करण्यात आले.
◆ केंद्रात व्दिदल राजकीय पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. या अंतर्गत मध्यवर्ती सूचितील काही खाती भारतीयांकडे सोपविण्यात आली तर महत्वाची खाती शासनाने स्वत:कडे राखून ठेवली.
◆ सिंध व ओरिसा नवीन प्रांत निर्माण करण्यात आले व ब्रम्हदेश भारतापासून वेगळा करण्यात आला.
◆ पं. नेहरूंनी या कायद्याचे वर्णन इंजिनाशिवाय ब्रेकची व्यवस्था केली अशा शब्दात केले आहे.
No comments:
Post a Comment