Friday, 26 June 2020

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4

यामध्ये एकूण 4 कलम आहेत व या भागाचे नाव संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र असे  आहे.

कलम 1

यानुसार संघाचे नाव भारत आणि India असे असेल. यामध्ये एकूण 28 राज्य व  9 केंद्रशासित प्रदेश  आहेत. व या सर्वांना मिळुन  संघराज्य क्षेत्र बनलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये 11  ब्रिटिश प्रांत आणि 562 देशी संस्थनिके (राजेरजवाडे) एवढे मिळून देशाचे क्षेत्र होते. यापैकी 20 देशी – संस्थानिके हे पकिस्तानमध्ये गेले. 542 पैकी 539 संस्थानिके भारतात विलिन  झाले. व तीन संस्थाने 

(1)जूनागढ   (2) हैद्राबाद   (3) J & K

यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.

1946 च्या त्रिमंत्री योजनेनुसार देषामध्ये 11 प्रांत आणि 542 देशी संस्थानिका मिळून A, B, C, D या स्वरूपाचे राज्य बनवण्यात आले.

पूर्ण मराठवाडा हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात होता. तो भारत स्वात्रंत्र्यं झाल्यावर 1948 मध्ये भारतात विलिन झाला. 1965 मध्ये India & Pak War च्या वेळेस लालबहादुरशास्त्री PM होते.

LAC (Line at Actual Contral) China Bordez

A] स्वरूपाचे राज्य :- 

जे क्षेत्र हिंदू बहूल असतील त्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असेल अशा स्वरूपाचे राज्य A स्वरूपाचे राज्यांमध्ये टाकण्यात आले. यामध्ये 216 देशी संस्थानिके मिळून 10 राज्य निर्माण करण्यात आले.

1)आसाम  2) बिहार  3) मुंबई  4) मध्यप्रदेश  5) मद्रास  6) ओरिसा  7) पंजाब  8) संयुक्त प्रांत   9) पश्चिम बंगाल  10) हैद्राबाद

B]  स्वरुपाचे राज्य :- 

यामध्ये मुस्लिम बहुल प्रांताचे समावेश करण्यात आले. यामध्ये एकंदरित राज्याची संख्या 8 होती.           

1) J & K  2) मध्यभारत  3) म्हैसूर (तिपुसुल्तानचा)  4)पैप्सू (पंजाबमधील लुधियाना)  5) राजस्थान  6) सौराष्ट  7) त्रावणकोर 8) कोचीन

C]  स्वरुपाचे राज्य :-

हे हिंदू आणि मुस्लिम दोघांचे मिळून ऐकत्रित प्रांत बनवण्यात आले. यामध्ये राज्यांची संख्या 9 होती.

▪️अजमेर
▪️भोपाल
▪️कुर्ग
▪️दिल्ली
▪️हिमाचल प्रदेश
▪️मणिपूर
▪️त्रिपुरा
▪️विंध्याप्रदेश
▪️कच्छा

D] स्वरूपाचे राज्य :-

यामंध्ये अंदमान व निकोबार यांचा समावेश करण्यात आला. स्वतांत्रप्राप्तीनंतर राज्याचे पुनर्गठन हे  भाषिक तत्वांवर व्हावे अशी जनतेची मागणी होवू लागली. त्यानुसार संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 27 November 1947 रोजी राज्य पुनर्गठन आयोग S.K. Dhar यांच्या अध्यक्षतेखाली बसवला. यांनी 1948 मध्ये आपला अहवाल सादर केला व असे सांगितले की राज्याचे पुनर्गठन भाषेच्या आधारावर न करता प्रशासनाच्या आधारावर करा.

धर च्या अहवालाचाही लोकांनी विरोध केला. कॉंग्रेसचे 1949 चे जयपूर अधिवेशनामधे राज्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी JVP समिती बसविण्यात आली. यामध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या / पट्ट्पति सीतारामय्या यांनी सुद्धा राज्य प्रशासनाच्या आधारावर बनवावे अशी शिफारस केली.

JVP प्रशासनाच्या आधारावर राज्य बनवावे.

JVP च्या अहवालाच्या मोठया प्रमाणात विरोध झाला. मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचा एक राज्य बनावा या करीता“ पोट्टीश्रीरामलु ” यांनी उपोषण सुरु केले. 56 दिवसानंतर त्यांची मृत्यु झाली. यामुळे हे आंदोलन तीव्र झाले. यानुसार 29 December 1952 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तेलगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश आंध्रप्रदेश निर्माण करण्याची घोषणा केलि. यानुसार 1 October 1953 रोजी भाषेवर अधारित पाहिले राज्य आंध्र प्रदेश हे बनले.

संविधान सभेचा सदस्य होता धर 1956 मध्ये फजल आली आयोग राज्य भाषेच्या आधारावर बनवण्यात यावे यासाठी बनवण्यात आले.

आणि या अनुसार इतर राज्यांनेही भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करण्यास सुरुवात केली. या करिता 22 December 1953 मध्ये भाषेवर राज्य बनवण्याकरिता राज्यपुनर्गठ आयोग बनवण्यात आला त्याचे अध्यक्ष फजल अली हे होते.

अध्यक्षासहित हृदयनाथ कुंजरू व इतिहासकार K. M. पाननीकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या आयोगाचे A, B, C, D, स्वरूपाचे राज्य विभाजित करून 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे अशी शिफारस केली या आधारावर राज्यपुनर्गठन अधिनियम 1956 पारित करण्यात आला आणि त्यानुसार भारत सरकारने 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.

1956 मध्ये भारत सरकारने बनवलेले 14 राज्य

आंध्रप्रदेश
आसाम
बिहार
बॉम्बे
जम्मू & कश्मीर (J & K)
केरला
मध्यप्रदेश
मद्रास
म्हैसूर
ओडिशा
पंजाब
राजस्थान
उत्तर प्रदेश (U. P)
पश्चिम बंगाल

No comments:

Post a Comment