Tuesday, 19 May 2020

WHOमध्ये भारताला मोठे पद.

👍भारत पुढच्या आठवड्यात जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) एक्झिक्युटिव्ह बोर्डाचा चेअरमन होत आहे.

👍कोरोनाच्या मुद्यावर जगातील अनेक देश चीनवरोधात आवाज उठवत आहेत. असे असतानाच, या चीन विरोधाचा सामना भारत कशापद्धतीने करतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

👍चीनने या महामारीसंदर्भात जगाला अंधारात ठेवले, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या चौकशीची मागणीही केली जाते आहे.

👍भारत डब्ल्यूएचओमध्ये जपानची जागा घेईल. या जागतीक संघटनेच्या साउथ-ईस्ट आशिया ग्रुपने सर्वसंमतीने या पदासाठी भारताच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

👍भारत एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या पुढील बैठकीत हे पद स्वीकारेल. यात डब्ल्यूएचओचे 194 सदस्य देश आणि पर्यवेक्षक भाग घेतील.

👍 विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात कोरोनाच्या मुद्यावर तणावाचे वातावरण असतानाच, भारत या पदाची सूत्रे आपल्या हाती घेत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...