अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.
अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.
या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.
केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.
दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.
केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.
क्षीण बल (Weak Force) :
इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.
· हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.
· निसर्गात सापडणार्या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.
No comments:
Post a Comment