Tuesday, 14 December 2021

राष्ट्रगीत (National Anthem)

- राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

- २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

- राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

- काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

- जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

- १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

- राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

- राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

- १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

- बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment