Sunday, 31 May 2020

IIT मद्रास संस्थेच्या संशोधकांनी ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ विकसित केले.


🅾 मद्रास (किंवा चेन्नई) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी अधिक कार्यक्षमतेनी कार्य करणारे कमी किंमतीचे ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ (PTC) प्रणाली विकसित केली आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रा. के. श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वात हे संशोधन केले गेले.

🧩ठळक वैशिष्ट्ये...

🅾ही प्रणाली डिसॅलिनेशन, स्पेस हिटिंग आणि स्पेस कूलिंग यासारख्या क्षेत्रात औद्योगिक वापरासाठी वापरली जाते.

🅾हे उपकरण वजनानी हलके आणि भारतीय हवामानाच्या परिस्थितीत उच्च ऊर्जा कार्यक्षमता असलेले आहे. उष्णता अनुप्रयोगांचा समावेश असलेल्या विविध प्रणालीमध्ये या उपकरणाचा उपयोग केला जाऊ शकतो.

🅾हे संशोधन सौर ऊर्जेच्या उत्पादकांना आणि संशोधकांना उच्च कार्यक्षमतेसह विविध उपकरणे बनविण्यात मदत करू शकते.

🅾राष्ट्रीय सौर अभियानाच्या अंतर्गत भारत सरकारद्वारे 2022 सालापर्यंत सौरऊर्जेद्वारे 20 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी यासारखे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते.

🧩 पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर (PTC) विषयी...

🅾‘पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ (PTC) प्रणालीमध्ये या प्रणालीमध्ये एक रिफ्लेक्टर, एक रिसीव्हर आणि त्यांना उभे धरून ठेवणारी संरचना तसेच एक ट्रॅकिंग एकक असते. रिफ्लेक्टरवर पडणारे सूर्यकिरण परावर्तित होऊन ते सर्व रिसीव्हर संचावर केंद्रित केले जातात. एकाच ठिकाणी सूर्यकिरण जमा झाल्यामुळे त्याठिकाणी अत्याधिक उष्मा तयार होते.

🅾ती उष्मा पाण्याची वाफ करण्यासाठी वापरली जाते आणि वाफ पुढे टर्बाइन आणि जनरेटर चालविण्यासाठी वापरली जाते आणि त्यापासून वीज निर्मिती होते.

No comments:

Post a Comment