- कोविड-19 रोगावरील उपचार पद्धतीत बदल करीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी (ICMR) रोगप्रतिकार शक्ती वाढवणे तसेच विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘हायड्रोक्झीक्लोरोक्वीन’ (HCQ) ऐवजी HIV वरील औषधे देण्याचे ठरवले आहे.
- शिवाय, कांगारा चहामधील रसायनेही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यात HIV वरील औषधांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. पालमपूर (हिमाचल प्रदेश) येथील हिमालयन जैवस्रोत तंत्रज्ञान संस्थेचे (IHBT) संचालक डॉ. संजय कुमार यांनी ही माहिती दिली. कांगारा चहाची हिमाचल प्रदेशात लागवड होते.
▪️कांगारा चहाचे औषधीयुक्त गुणधर्म
- कांगारा चहात मनुष्यप्राणीच्या शरीराला लाभदायक ठरणारे गुणधर्म आहेत. IHBT संस्थेनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कोविड-19 वर मात करण्यासाठी हे सिद्ध केले आहे.
- शास्त्रज्ञांना कांगारा चहात '65 बायोॲक्टीव' रसायने किंवा 'पॉलिफेनोल्स' आढळून आली. त्यांच्या संयोगाने ते विशिष्ट विषाणूवर अधिक प्रभावी ठरु शकते. सध्या HIV वरील बाजारात उपलब्ध औषधांपेक्षाही ही रसायने अधिक प्रभावी आहेत. सध्या HIV वरील मान्यताप्राप्त औषधे कोविड-19 रुग्णांवर उपचारासाठी वापरली जात आहेत.
- 'कॅटेचिन' हे नैसर्गिक आरोग्यवर्धक घटक आहे. पेशींचे नुकसान टाळणे आणि इतर अनेक फायदे प्रदान करणे, यासाठी ते ओळखले जाते. कांगारा चहात ते पुरेपूर आहे.
- कांगारा चहा मधील रसायने मानवी शरीरातल्या प्रथिनेयुक्त विषाणूंना प्रतिबंध करु शकतात, असा दावा करण्यात आला आहे.
- तसेच संस्थेनी या चहाचा वापर करून अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझर, औषधी साबणचीही निर्मिती केली आहे. बुरशीविरोधी, जीवाणूविरोधी, स्वच्छतायुक्त आणि आर्द्रतायुक्त लाभदायक गुणधर्म आहेत.
No comments:
Post a Comment