स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.
◾️वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स
◾️कार्य :
हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.
◾️हृदयाची रचना:
मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये
१) डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
२) उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
3) डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
४) उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle)
यांचा समावेश होतो.
अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.
उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.
१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)

उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.
उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.
डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.
डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.
डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.
हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.
हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

◾️हृदयाची कार्यपद्धती :
अलिंदांचे व निलयांचे लयबद्ध आकुंचन व प्रसरण सतत होत असते. (Rhythmic Contraction And Relaxation Of the Auricles And Ventricles)
मात्र अलिंद व निलय एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाही. ज्यावेळी अलिंदे आकुंचन पावलेली असतात त्यावेळी निलये मात्र प्रसरण पावलेली असतात. त्याचप्रमाणे, ज्यावेळी निलये आकुंचन पावलेली असतात त्यावेळी अलिंदे प्रसरण पावलेली असतात.
हृदयाच्या आकुंचनाला Systole म्हणतात, तर हृदयाच्या प्रसारणाला Diastole म्हणतात.
◾️हृदयाचे ठोके (Heart Beats):
हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एकचक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका होय.
एका ठोक्यासाठी ०.८ सेकंद लागतात.
प्रौढ व्यक्तींमध्ये – ६० ठोके / मिनिट
झोपेत असताना – ५५ ठोके / मिनिट लहान मुलांमध्ये – १२०-१६० ठोके/ मिनिट
हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात (Origin Of heart Beat) – ठोक्याची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील Sino-Auricular node (S-A Node) मध्ये होते. त्याला pacemaker असे म्हणतात.
हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल तर तो नियंत्रित करण्यासाठी Pacemaker नावाचेच इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात.
ठोके मोजण्यासाठी Sthethescope वापरला जातो.
ठोक्यांच्या स्पंदनांचा आलेख काढण्यासाठी ECG (Electro Cardio Gram) चा वापर केला जातो. अनियमित ठोक्यांच्या निदानासाठी
1) ECG – ठोक्यांच्या स्पन्दनांचा आलेख
2) CT Scan – Computerised Tomography
3) MRI – Magnetic Resonance Imaging
◾️रक्तदाब (Blood Pressure) :
रक्तदाब Sphygmo manometer मध्ये मोजतात.
साधारण रक्तदाब (Normal B.P.) = 120/80 mm Of Hg असतो. तर हृदयाच्या प्रसरणाच्या वेळी तो 80 mm of Hg असतो.
उच्च रक्तदाब (High B.P.) = 160/95 mm of Hg पेक्षा जास्त
कमी रक्तदाब (Low B.P.) = 100/60 mm of Hg पेक्षा कमी रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे असतो.
धमनी -केशवाहिन्या – शिरा / नीला
रक्तभिसरणाचा मार्ग: शरीरात हृदयाच्या एका ठोक्यादरम्यान हृदय रक्ताभिसरणाच्या दोन क्रिया घडवून आणते ; १) फुफ्फुस रक्तभिसरण २) देह रक्तभिसरण

१) फुफ्फुसी रक्तभिसरण (Pulmonary Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनविरहित रक्त हृदयाकडून फुफ्फुसांकडे नेले जाते व ते जेथे ऑक्सिजनयुक्त झाल्यावर परत हृदयाकडे आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात: शरीराच्या सर्व भागाकडून उजव्या अलिंदात आलेले ऑक्सिजनविरहित रक्त ->उजव्या निलयामध्ये ->तेथून फुफ्फुस धमन्यांद्वारे फुफ्फुसांकडे उच्च दाबाने पोहोचविले जाते -> फुफ्फुसांमध्ये वायूंची अदलाबदल होऊन रक्त ऑक्सिजनयुक्त बनते -> ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस शिरांद्वारे हृदयाच्या डाव्या अलिंदाकडे
२) देह रक्ताभिसरण (Systemic Circulation)
या क्रियेमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाकडून शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते आणि पेशींकडून ऑक्सिजनविरहित आणि कार्बन डायॉकसाईडयुक्त रक्त जमा केले जाऊन ते हृदयाकडे परत आणले जाते.
या क्रियेत पुढील टप्पे येतात:
डाव्या अलिंदात जमा झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त -> डाव्या निलयात उतरते -> जात भिंतींचे डावे निलय उच्च दाबाने त्यास महाधमनीत पाठवते -> तेथून ते शरीराच्या सर्व पेशींकडे पोहोचविले जाते->तेथे वायूंची अदलाबदल होते आणि ऑक्सिजनविरहित रक्त उर्ध्व आणि अधोशिरांद्वारे उजव्या अलिंदात जमा होते.
◾️Heart Surgery:
पहिले हृदय प्रत्यारोपण (1st Human-ti-Human Heart Transplant) 3 डिसेंबर 1967 मध्ये दक्षिण आफ्रिकेत ख्रिश्चन बर्नार्ड यांनी Groote Schuur Hospital येथे घडवून आणले.
भारतातील पहिले हृदयाचे सफल प्रत्यारोपण डॉ. पी. वेणुगोपाल यांनी घडवून आणले.
भारतातील पहिली Open Heart Surgery – Christian Medical Collage, Vellore (1959)येथे घडवून आणण्यात आली.
◾️हृदयरोग (Heart Diseases):
जन्मतःच हृदयात दोष असणे (Congenital heart disease)-
जन्मतःच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना Blue Baby असे म्हणतात. कारण, त्यांचे ओठ, नखे तसेच, त्वचा निळसर रंगाची बनते.
No comments:
Post a Comment