Wednesday, 6 May 2020

DRDOच्या प्रयोगशाळेनी अतिनील निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला

- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) याच्या दिल्लीतल्या लेजर सायंस अँड टेक्नॉलॉजी सेंटर (LASTEC) या प्रयोगशाळेनी अतिबाधित क्षेत्रांमध्ये वेगाने आणि रसायन-रहीत निर्जंतुकीकरणासाठी अतिनील (UV) निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केला आहे. या उपकरणाला ‘UV ब्लास्टर’ असे नाव देण्यात आले आहे.

- संस्थेनी न्यू एज इंस्ट्रुमेंट्स अँड मटेरियल्स प्रायवेट लिमिटेड (गुरुग्राम) या कंपनीच्या सहकार्याने उपकरणाचे आरेखन केले आहे आणि विकसित केले.

▪️उपकरणाची ठळक वैशिष्ट्ये  

- हे उपकरण अतिनील किरणांच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण करते. 

- या उपकरणात चौफेर किरणोत्सर्ग होण्यासाठी ‘254 nm’ लहरींवर सहा दिवे बसवले आहेत. प्रत्येक दिव्याची ऊर्जा क्षमता 43 UV-C वॅट एवढी आहे.

- खोलीत विविध ठिकाणी हे उपकरण बसवता येते. त्यानुसार अंदाजे 12x12 फुट आकाराची एक खोली 10 मिनिट आणि 400 वर्ग फुटाची खोली 30 मिनिटांमध्ये निर्जंतुक केली जाऊ शकते.

- प्रयोगशाळा, कार्यालय, विमानतळ, मॉल, उपहारगृह, कारखाने अशा महत्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येऊ शकतो.

- अतिनील किरणांवर आधारित निर्जंतुकीकरणासाठी वायफायचा वापर करुन मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारेही दूर ठिकाणी ही प्रक्रीया करता येऊ शकते.
------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...