Tuesday, 14 December 2021

राज्यघटना प्रश्नपत्रिका

1) "अपराधाबद्दलच्या दोषसिद्दी संबंधात संरक्षण " घटनेत अशी तरतूद पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे ?

1) अनुच्छेद 20
2)अनुच्छेद 21
3)अनुच्छेद 22
4)अनुच्छेद 23

2) अचूक विधान शोधा

अ) देशात एका व्यक्तीला एका वेळी एका गुन्ह्याबाबत एकच शिक्षा दिली जाते
ब)देशात अस्तित्वात असलेल्या कायद्यानेच शिक्षा दिली जाऊ शकते अन्यथा नाही

1)फक्त अ                        2)फक्त ब
3)दोन्ही                           4)एकही नाही

3)कोणत्याही अपराधाचा आरोप असलल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही अशी तरतूद कोणत्या अनुच्छेद मध्ये आहे ?

1)अनुच्छेद 20 (1)
2)अनुच्छेद 20(2)
3)अनुच्छेद 20(3)
4) अनुच्छेद 22

4) अयोग्य विधान शोधा

अ)कायद्याने प्रक्रिया स्थापन केल्याशिवाय कोणाचे ही जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य वंचित केले जाऊ शकते
ब)जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याबाबत घटनेत कोणतीेही तरतूद नाही

1)फक्त अ                       2) फक्त ब
3) दोन्ही                         4) एकही नाही

5) अनुच्छेद 21 (A) मध्ये नमूद केल्याप्रमाणे .......... कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल अशी तरतूद आहे?

1) राष्ट्रपतीला
2) केंद्र सरकारला
3) राज्यपालला
4) राज्य सरकारला

6) मूळ घटनेत मूलभूत अधिकारात प्रत्यक्ष स्वरूपात जरी शिक्षणाचा हक्क नसला तरी अप्रत्यक्ष स्वरूपात मूलभूत अधिकार अनुच्छेद 21 मध्ये आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सांगितले होते ?

1) ए.के. गोपालन
2) गोलकनाथ केस
3) केशवानंद भारती केस
4) उन्नीकृष्णन केस

7) अनुच्छेद 22 (1 ) बाबत योग्य पर्याय
      निवडा

अ) कोणत्याही व्यक्तीस अटक केल्यास शक्य तितक्या लवकर अटकेचे कारण कळवावे लागते
ब) असे कळवल्या शिवाय स्थानबद्ध करता येत नाही
क) तसेच यानुसार त्यांना वकिलांची मदत /सल्ला घेण्याचा अधिकार आहे

1) अ आणि क                2) ब आणि क
3) अ आणि ब                 4) वरील सर्व

8) अनुच्छेद 22 (3)  मधील तरतुदी
     पुढील पैकी कोणत्या देशातील
      नागरिकांना लागू होत नाहीत ?

अ)पाकिस्थान
ब) बांगलादेश
क) चीन
ड) अफगाणिस्थान

1)अ आणि ब                    2) अ,ब,क
3) ब,क,ड।                       4) वरील सर्व

9) अनुच्छेद 22 (4)  मध्ये पुढीलपैकी
     कोणत्या न्यायाधीशाची तरतूद आहे ?

अ) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत
ब) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले
     असतील
क) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
     होण्याची पात्रता ठेवणारे न्यायाधीश

1)फक्त अ.                   2) फक्त क
3) वरील सर्व                4)  एकही नाही

10) मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत
       स्वातंत्र्याच्या अधिकारात किती
       अनुच्छेदाचा समावेश आहे ?

1) तीन          
2) चार
3) पाच
4) सहा

आजचा संपूर्ण पेपर अनुच्छेद 20,21,22 वर आहे

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✅ राज्यघटना उत्तरे ✅

1)- 1

2)- 3

3)- 3

4)- 3 अ) कायद्याने स्थापित केल्याशिवाय
               वंचित करता येत नाही
          ब) अनुच्छेद 21 मध्ये नमूद आहे

5)- 4 ( राज्यसरकार  हा शब्द नमूद आहे)

6)- 4 ( उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्रप्रदेश
           राज्य 1993 )
7)- 4

8)- 2

9)- 3 ( यापैकी कोणतीही पात्रता असेल
          तरीही चालते असेच नमूद आहे )

10)- 2 (  A- 19,20,21,22  असे एकूण
            4 आहेत )

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...